30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामावॉचमनने चुकीचा नंबर दिला आणि दरोडेखोर फसले!

वॉचमनने चुकीचा नंबर दिला आणि दरोडेखोर फसले!

Google News Follow

Related

आयकर अधिकारी बनून सुवर्णकराच्या घरी दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना इमारतीच्या वॉचमनने घाबरून दुसऱ्याच फ्लॅटचा क्रमांक दिल्यामुळे दरोडेखोर भलत्याच फ्लॅटमध्ये घुसले आणि दरोडेखोरांचा प्लॅनच फिस्कटला. दरोडेखोरांना रिकाम्या हाती जावे लागल्याची घटना पश्चिम उपनगरातील खार येथे घडली. पळून गेलेल्या दरोडेखोरांपैकी तिघांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

खार पश्चिमेतील एका प्रतिष्ठित सोसायटीत राहणाऱ्या एका सुवर्णकाराच्या घरात २० कोटीची रोकड आणि कोट्यवधीचे सोन्याचे दागिने असल्याची माहिती एका टोळीला मिळाली होती. या टोळीने आयकर अधिकारी बनून या सुवर्णकाराच्या घरी दरोडा घालण्याची योजना आखली होती. या पाच जणांच्या टोळीने आठवड्याभरापूर्वी सुवर्णकार राहत असलेल्या इमारतीत प्रवेश केला.

इमारतीच्या वॉचमनने त्यांना अडवले असता आम्ही आयकर अधिकारी असल्याचे सांगून वॉचमनला दम दिला आणि सुवर्णकाराचे नाव सांगून त्याचा फ्लॅट नंबर विचारला. घाबरलेल्या वॉचमनने त्यांना चुकून पहिल्या माळ्यावरील भलत्याच्या फ्लॅटचा क्रमांक दिला. आयकर अधिकारी बनून आलेल्या या पाच जणांपैकी एकाने पहिल्या मजल्यावरील चुकीच्या फ्लॅटचा दरवाजाची बेल वाजवली व इतर चौघे जण लिफ्टमध्ये दडून बसले होते. दार उघडताच त्याने कुरियर बॉय असल्याचे सांगून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

त्यादरम्यान, पाहिल्या मजल्या वरील व्यक्तीसोबत झटापट झाली. इतर चौघे तोपर्यंत दुसऱ्या मजल्यावरील सुवर्णकाराच्या घराजवळ पोहोचले, मात्र पहिल्या मजल्यावरील गोंधळामुळे आपण पकडले जावू या भीतीने पाचही जणांनी इमारतीतून पळ काढला.या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून या टोळीचा शोध घेऊन पाच जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा