27 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरक्राईमनामापंतप्रधानाच्या ताफ्यात घुसणाऱ्या संशयित व्यक्तीला अटक

पंतप्रधानाच्या ताफ्यात घुसणाऱ्या संशयित व्यक्तीला अटक

नवी मुंबईत राहणारा इसम

Google News Follow

Related

एनएसजी कमांडोचे ओळखपत्र गळ्यात घालून पंतप्रधान यांच्या ताफ्यात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका संशयित व्यक्तीला बीकेसी येथून अटक करण्यात आली आहे.

या व्यक्तीकडून पोलिसांनी एनएसजी कमांडोचे बोगस ओळखपत्र जप्त केले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

रामेश्वरप्रसाद दयाशंकर मिश्रा (३५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तिचे नाव आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे राहण्यास असणारा रामेश्वर याला गुरुवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान या ठिकाणी संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेना पाहून व्ही.पी.सिंह का आठवले?

 ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनकही म्हणाले,आम्ही मोदींची माणसं.

माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत जखमी; आणखी एका नेत्याला अपघात झाला!

कुर्ला गोळीबारातील संशयित मनसेचा कार्यकर्ता?

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (एनएसजी ) कमांडो असल्याचे सांगून ओळ्खपत्र दाखवले. परंतु त्याने दाखवलेले ओळखपत्र तपासले असता ते ओळखपत्र बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची देत होता, अखेर त्याला बीकेसी पोलीस ठाण्यात आणून त्याचे ओळखपत्र तपासले असता तो बोगस असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी बीकेसी पोलीसानी रामेश्वर याच्या विरुद्ध बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा