24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरक्राईमनामामुंबईतून ८ तोतया आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

मुंबईतून ८ तोतया आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

सायन येथील व्यवसायिकाच्या घरी टाकला होता छापा

Google News Follow

Related

आयकर विभागाचे अधिकारी सांगून एका व्यवसायिकाच्या घरी छापेमारी करणाऱ्या ८ जणांच्या टोळीला सायन पोलिसांनी अटक केली आहे. व्यवसायिकाने मुलीच्या लग्नासाठी जमवलेली १८ लाख रुपयांची रक्कम या टोळीने लंपास केली होती. अटक करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये दोघे जण हिंदी मराठी सिरीयल मध्ये साईट ऍक्टर म्हणून काम करणारे आहे.
संतोष पटले (३३),राजाराम मांगले (४७) अमरदीप सोनवणे (२९),भाऊराव इंगळे (५२), सुशांत लोहार (३३), शरद एकावडे (३३), अभय कासले (३३) आणि रामकुमार गुजर (३८) असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयकर अधिकारी यांची नावे आहेत. मानखुर्द , नवीमुंबई परिसरातून या टोळीला अटक करण्यात आली आहे.

सायन येथे राहणारे इमिटेशन ज्वेलरीचे व्यवसायिक पटावा यांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी १८ लाख रुपयांची रोकड जमवुन घरात ठेवले होते. २६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास पटवा यांच्या घरी चार अनोळखी इसम आले व त्यापैकी एकाने आयकर विभागाचे ओळखपत्र दाखवून आयकर अधिकारी असल्याचे सांगून घरात प्रवेश केला. पटवा कुटुंबातील पुरुष सदस्यांना सांगितले की सर्व मौल्यवान वस्तू जप्त केल्या जातील, परंतु कोणालाही अटक केली जाणार नाही आणि लवकरच अधिकृत नोटीस जारी केली जाईल असे सांगून घरातील १८ लाख रुपये रोख घेऊन ते इनोव्हा मोटारीतून निघून गेले.

 

पटवा कुटुंबातील एका सदस्याने नंतर त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. सीएने काही चौकशी केल्यावर कुटुंबाला लुटल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिस तक्रार नोंदवण्यास सांगितले.तक्रार आल्यानंतर सायन पोलिसांनी कारवाई केली. आरोपीने वापरलेली इनोव्हा पीडितेच्या इमारतीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मानखुर्द येथील सरिता मांगले या महिलेच्या नावाने वाहनाची नोंदणी करण्यात आली होती. पोलीस तिच्याजवळ आले आणि तिने सांगितले की हे वाहन तिचा पती राजाराम (४७ ) वापरत आहे. पोलिसांनी राजारामला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ ​​धाडीला अटक!

ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी

उद्धव ठाकरे आणखी किती रडारड करणार?

‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!

 

मांगले यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी एक एक करून उर्वरित आरोपींना अटक केली. संतोष पटले (३७), अमरदीप सोनवणे (२९), भाऊराव इंगळे (५२, हे तिघेही रिअल इस्टेट व्यवसायात असून मानखुर्द येथील रहिवासी आहेत. सुशांत रामचंद्र लोहार (३३, रा. चालक आणि मानखुर्दचा रहिवासी) हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार होता. लोहार हा वाहन चालक म्हणून काम करतो, पटवा च्या घरात १० कोटी रुपयांची रोकड असल्याचे राजकुमार गुजरच्या सांगण्यावरून माहिती कासलेने लोहार याला दिली होती. गुजर हा पटवा कुटुंबातील एका सदस्याचा मित्र असून त्याला अशी माहिती मिळाली होती की पटवा यांनी गावची जमीन विकून घरात १० कोटी रुपयांची रोकड ठेवली आहे.

या महितीनंतर लोहार याने योजना आखून आयकर विभागाचे अधिकारी बनून पटवा यांच्या घरावर छापा टाकला होता, छाप्यात मिळालेली १८ लाखाची रक्कमेची या टोळीने समान वाटणी केली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) प्रशांत कदम यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा