34 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरक्राईमनामाक्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण

क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण

Google News Follow

Related

क्रिप्टोकरन्सीसाठी एका व्यापाराचे थेट अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या सात साथीदारांना अटक करण्यात आली आहे. दिलीप खंदारे असं या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

३०० कोटीं रुपयांची क्रिप्टोकरन्सी मिळेल या लालसेपोटी दिलीप खंदारे याने हा गुन्हा केल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. दिलीप खंदारे याने आपला मित्र प्रदीप काशीनाथ काटे याच्यासह कट रचून विनय सुंदरराव नाईक नावाच्या व्यक्तीचे अपहरण केले होते. दिलीप खंदारे हा पूर्वी पुणे सायबर पोलीस शाखेत कार्यरत होता. त्यावेळी त्याने ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, ॲडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक कॉम्प्युटर हार्डवेअर अँड टेक्नॉलॉजी आणि मोबाइल फॉरेन्सिक सारखे अद्यावत कोर्स केले होते.

दरम्यान त्याला विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे ३०० कोटींचे बिटकॉईन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी असल्याचे समजले होते. काही दिवसानंतर त्याची बदली पिंपरी चिंचवड येथे झाली. तेव्हा दिलीप याने आपल्या इतर सहा सात मित्रांच्या मदतीने विनय नाईक याचे अपहरण करून त्याला अलिबाग येथे डांबून ठेवले. मात्र, पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच अपहरण केलेल्या विनय याला त्यांनी पुन्हा वाकड परिसरात सोडून दिले.

हे ही वाचा:

राज्यातील निर्बंध शिथिल; काय आहे नवी नियमावली?

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव

त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी पोलिस कर्मचारी दिलीप खंदारे आणि त्याचे साथीदार सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टीमिटो डिसुझा, मयूर महेंद्र शिरके, प्रदीप काशीनाथ काटे, शिरीष चंद्रकांत खोत आणि संजय उर्फ निकी राजेश बन्सल यांना अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा