29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरविशेषराज्यातील निर्बंध शिथिल; काय आहे नवी नियमावली?

राज्यातील निर्बंध शिथिल; काय आहे नवी नियमावली?

Google News Follow

Related

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनच्या राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. पर्यटनस्थळे, सफारी, राष्ट्रीय उद्याने, लग्नसोहळे, कार्यक्रम, अंत्यसंस्कार यासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत.

काय आहे नवी नियमावली?

  • लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी
  • अंत्ययात्रेमधील उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत.
  • मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्यांचे लसीकरण झालेले असावे.
  • नॅशनल पार्क आणि जंगल सफारी नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. मास्कचे बंधन असेल. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावे लागेल.

हे ही वाचा:

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव

काँग्रेसचा नेता कन्हैय्या कुमारच्या अंगावर फेकली शाई

  • अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु होतील.
  • स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये ५० टक्के उपस्थितीला परवानगी.
  • उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह, नाट्यगृहांना स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने परवानगी.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा