29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरक्राईमनामागर्भवती महिलेने आपल्या मुलीची हत्या का केली?

गर्भवती महिलेने आपल्या मुलीची हत्या का केली?

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

विरार मध्ये एका गर्भवती महिलेने दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी ही घटना घडली होती. सोमवारी शवविच्छेदन अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार पुर्वेच्या फुलपाडा येथील पारिजात अपार्टमेंट या इमारतीमध्ये सोनुकूमार सोनी (३२) हा रिक्षाचालक पत्नी नेहा (२२) हिच्या सोबत राहतो. त्यांना नानसी (२) आणि १ वर्षीची  अशा दोन मुली आहेत. नेहा ही सात महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी संध्याकाळी नानसी घरात खेळताना पडून बेशुद्ध पडल्याचे नेहाने सांगितले. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. नानसीवर विरारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना कळवले. रात्री विरार पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली होती.

हे ही वाचा:
१५ ऑगस्टचे ध्वजारोहण रोखा आणि दहा लाख डॉलर कमवा

…त्या १५० शिक्षकांसाठी तीव्र आंदोलन

स्वागत!! ऑलिम्पिकवीरांनी क्रिकेटपटूंना टाकले मागे

सुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी

सोमवारी नानसीच्या शवविच्छेदानाचा अहवाला आला. त्यात डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. त्यामुळे  पोलिसांनी यामृत्यूप्रकऱणी नेहाकडे कसून चौकशी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. घरात काम करत असताना नेहाने नानसीला जोरात मारले होते. त्यात नानसी न्हाणीघराच्या दरवाज्यावर आपटली आणि खाली पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आम्ही नेहा सोनीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा