26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाबजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात मोर्चा

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात मोर्चा

Related

जिहादी मानसिकता असलेल्यांकडून हिंदूंवर होणारे हल्ले वाढत आहेत. उदयपूर, अमरावतीनंतर आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे अशी घटना समोर आली आहे. मुंब्रा या मुस्लीम भागात बजरंग दलाचे दोन कार्यकर्ते, ठाणे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सर्वेश तिवारी आणि त्यांचे सहकारी अभिषेक सिंग कोणाला तरी भेटायला गेले होते. यादरम्यान त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी मंगळवार, ५ जुलै रोजी ठाण्यात मोर्चा काढला. मुसळधार पावसाच्या दरम्यान, मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी इस्लामिक दहशतवादाचा निषेध केला. यापुढे हिंदू समाज असे हल्ले सहन करणार नाही, अश्या घोषणा दिल्या आहेत.

आंदोलकांनी भगवे ध्वज हातात घेतले होते. या हल्ल्यामागे पीएफआयचे नाव सांगितले जात आहे. याप्रकरणी मुब्रा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास आणखी हिंसक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

नुपूर शर्मांवर संतप्त झालेल्या न्यायाधीशांविरोधात माजी न्यायाधीश, आयएएस अधिकारी

‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उदयपूरच्या कन्हैयालाल यांनी पोस्ट केली होती. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना मारण्यात आले. त्यापूर्वी अमरावतीचे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. त्यांनीही नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. या दोन्ही हत्येमागील आरोपींना अटक केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा