26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरदेश दुनियाडबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

Related

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान अनेक गोष्टींची आयात बंद करत आहे. काही दिवसांपूर्वीच पाक सरकारने नागरिकांना चहा कमी पिण्याचे आवाहन केले होते. ऊर्जा बचतीसाठी सुद्धा पाकिस्तानने अनेक पावले उचलली होती. एकीकडे पाकिस्तनला आपला खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) सरकारने ३४ कोटी रुपये खर्च करून ७२ नव्या आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. पीओके सरकारच्या या निर्णयाला नागरिकांनीही विरोध दर्शवला आहे.

पीओके सरकारने अध्यक्ष बॅरिस्टर सुलतान महमूद यांच्यासाठी या सर्व आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. ही सर्व वाहने अशा वेळी खरेदी करण्यात आली आहेत, जेव्हा पीओके सरकारचे मंत्री सतत पाकिस्तान सरकारने त्यांच्या बजेटमध्ये कपात केल्याच्या तक्रारी करत आहेत. पाकिस्तान सरकारने पीओकेच्या विकास बजेटमध्ये अडीच अब्ज रुपयांची कपात केली आहे. पाकिस्तान आपला खर्च भागवण्यासाठी संघर्ष करत आहे आणि या भागात पाकव्याप्त काश्मीरला देण्यात येणाऱ्या निधीतही कपात केली आहे. या कपातीमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीही बिकट झाली आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांवर संतप्त झालेल्या न्यायाधीशांविरोधात माजी न्यायाधीश, आयएएस अधिकारी

मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी; रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका

‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती

चिनी कंपनी विवोवर ईडीची मोठी कारवाई

सरकारच्या या निर्णयाविरोधात लोक आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी आंदोलन केले आहे. अशा कठीण काळात या निर्णयामुळे पीओकेची अर्थव्यवस्था आणखी कोलमडू शकते, असे सांगितले जात आहे. या वाहनांमध्ये मर्सिडीज आणि मॅटिक सेडान सारख्या सर्व वाहनांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पीओके सरकारच्या आलिशान कार खरेदीच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा