पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात एका जत्रेत एका स्टंटमनचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर पंजाब सरकारने सोमवारी ट्रॅक्टरसह कोणत्याही प्रकारच्या स्टंट किंवा धोकादायक कामगिरीवर सरकारने बंदी घातली आहे.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले की, “प्रिय पंजाबी लोकांनो, ट्रॅक्टरला शेताचा राजा म्हटले जाते. त्याला मृत्यूचा देवदूत बनवू नका. पंजाबमध्ये ट्रॅक्टर आणि संबंधित उपकरणांसह कोणत्याही प्रकारचे स्टंट किंवा धोकादायक कामगिरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.याबाबत बाकी तपशील लवकरच, असे ट्विट मान यांनी केले आहे.
पंजाबराज्यातील गुरुदासपूरमधील बटाला येथे एका जत्रेत ‘ट्रॅक्टरवर स्टंट’ करत असताना ट्रॅक्टरच्या धडकेने 29 वर्षीय स्टंटमनचा चिरडून मृत्यू झाला.त्यांनतर सरकारने बंदीचा निर्णय घेतला.सुखमनदीप सिंग असे या स्टंटमनचे नाव आहे.सुखमनदीप सिंग हा स्वतःच्या ट्रॅक्टरच्या साह्याने स्टंट करत असताना तो ट्रॅक्टरखाली आला आणि त्याचा चिरडून मृत्यू झाला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा:
ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार
तेलंगणामध्ये प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला
शरद पवारांइतका ठामपणा शिंदे का दाखवत नाहीत?
मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा!
सारचूर गावातील क्रीडा मैदानावर जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.या जत्रेत स्टंट करण्यासाठी सुखमनदीप सिंग स्वतःच्या ट्रॅक्टरसह क्रीडा मैदानात आला व सहभागी झाला.त्याने स्टंट करताना प्रथमतः स्वतःच्या ट्रॅक्टरची पुढची चाके उभी केली, नंतर मागचे टायर जमिनीवर दाबले आणि ट्रॅक्टरच्या बाजूने धावू लागला.
मात्र, ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि सुखमनदीप सिंग हा बाजूला उभ्या असलेल्या जमावाच्या दिशेने पळू लागला.सुखमनदीप सिंग ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रॅक्टरजवळ आला परंतु नियंत्रणाबाहेर गेलेल्या ट्रॅक्टरच्या खाली तो खेचला गेला आणि अडकला. आजूबाजूच्या दोन लोकांनी सुखमनदीप सिंगला ट्रॅक्टर खालून काढण्याचा प्रयत्न करत होते, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकारने ट्रॅक्टर स्टंटबाजीवर बंदी घातली आहे.