31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामा'शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात'

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

Google News Follow

Related

प्रसिद्ध उदयोगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने गुरुवारी दुपारी चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासह तिघांना अटक केली आहे. या तिघांच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक झालेल्याची संख्या १० झाली आहे. या तिघांना गुरुवारी एनआयए च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांना २८ जून पर्यत एनआयए कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी एनआयए च्या रडारवर असून लवकरच या अधिकाऱ्याला एनआयए कडून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनीष आणि सतीश हे दोघे प्रदीप शर्मा साठी काम करतात त्याचे पंटर म्हणून ओळखले जातात मनसुख हिरेन याच्या हत्येत या दोघांचा समावेश आहे. विनायक शिंदेसह मनीष आणि सतीश मनसुखला मारण्यासाठी एका कारमध्ये होते व त्यांनीच मृतदेह खाडीत फेकला होता. सतीश मोटेकरी ,विनायक शिंदे, मनीष सोनी, संतोष शेलार आणि आनंद जाधव या पाच जणांनी मिळून मनसुखची हत्या केली आणि मृतदेह खाडीत टाकला होता, असे एनआयएने न्यायालयात सांगितले.

एनआयएने सुनील मानेच्या कोठडीची केली मागणी

प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतर आरोपींचा समोरासमोर चौकशी करण्यासाठी एनआयएने पुन्हा एकदा त्यांच्या कोठडीची मागणी केली. ज्या तवेरा गाडीत मनसुखची हत्या झाली ती गाडी आरोपी संतोष शेलारची आहे. या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर काही महत्वाचे डीएनए मिळालेत जे या आरोपींचे आहेत ते महत्त्वाचे पुरावे आहेत.

हे ही वाचा:
…म्हणून झाली प्रदीप शर्मांना अटक

शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही

‘तिसऱ्या लाटेचा धोका सांगता आणि डॉक्टरांची सेवाही खंडित करता’

भेसळीचे दुध ठरतेय मुंबईकरांसाठी जीवघेणे

कोर्टात एनआयएने दिलेली माहिती –

शर्मा यांच्या घरातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाली आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी असा प्रश्न एनआयएने कोर्टात उपस्थित केला. शर्मा यांनी त्यावर उत्तर दिले की, १९९७ साली हे पिस्तुल मला मिळालं होतं. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्या पिस्तुलचे लायसन्स माझ्याकडे आहे फक्त त्याचे नूतनीकरण करता आले नाही.

एनआयएने न्यायालयात सांगितले की, मनसुख याची हत्या ज्या दिवशी झाली तेव्हा वाझेने त्याला फोन करून घोडबंदर रोडला बोलवले होते. त्यावेळी वाझेसोबत सुनील माने होता. दोघांसोबत मनसुख गाडीत बसला आणि त्यानंतर मनसुखला वाझे आणि माने याने इतर आरोपींकडे सोपविले. मनसुखला ज्या गाडीत बसवण्यात आले ती गाडी आरोपी मनीष सोनी चालवत होता आणि त्याच गाडीत आरोपी सतीश, संतोष शेलार आणि आनंद जाधव होते ज्यांनी मनसुखची हत्या केली असा आम्हाला संशय आहे. आम्हाला न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी सुनील मानेची पुन्हा कोठडी हवी आहे जेणेकरून या आरोपीना समोरासमोर बसवून आम्ही चौकशी करू शकू.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा