26 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरक्राईमनामा'पुष्पा' फेम अभिनेता जगदीशची जामिनावर मुक्तता

‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदीशची जामिनावर मुक्तता

अल्लू अर्जुसोबत चित्रिकरणाला सुरुवात

Google News Follow

Related

पुष्पा चित्रपटातील अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याला जामीन मिळाला असून त्याने ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. जगदीशच्या येण्याने सेटवर आनंदाचे वातावरण आहे. जगदीश तुरुंगात असल्यामुळे ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे चित्रिकरण रेंगाळले होते. त्याची दृश्ये चित्रपटात अत्यंत आवश्यक असल्याने त्यांची वाट पाहिली जात होती. अर्थात याबाबत अद्याप चित्रपट निर्मात्यांकडून अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. जगदीश याच्यावर महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

एका महिलेची वैयक्तिक छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप जगदीशवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर जगदीशला ६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या महिलेचे जगदीशसोबत प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

पोलीस यंत्रणा सतर्क; मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीवर ईडीचा छापा!

१० वर्षात अर्थव्यवस्थेत विकास, पंतप्रधान मोदींमुळे प्रगती,पंतप्रधान मोदींचा जय अनुसंधानचा नारा!

मोठी घोषणा! ४० हजार सामान्य बोगी आता वंदे भारतप्रमाणे

कोण आहे जगदीश?

अभिनेता जगदीश याने सन २०१८मध्ये त्याच्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांत कामे केली. मात्र सन २०२१मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटानंतर त्यांची लोकप्रियता वाढली. ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुन, फाहाद फासिल, रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत. हा चित्रपट याच वर्षी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा