टेनिसपटू राधिका यादवचा खून तिच्या वडिलांनी तिच्यासाठ उघडण्यात आलेल्या टेनिस अकादमीच्या वादातून केल्याचे आता समोर येत आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांनी तिचा खून करण्याआधी स्वतःचा जीव घेण्याचा विचारही केला होता. या धक्कादायक घटनेमुळे क्रीडा विश्वात संताप व्यक्त होत आहे.
पोलिस तपासात असे समोर आले आहे की, राधिकाचा तिच्या वडिलांशी, दीपक यादव यांच्याशी, खून होण्याच्या आधी अनेक वेळा वाद झाला होता.
स्रोतांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दीपक यादव वाझीराबाद गावात गेले होते. तिथे काही गावकऱ्यांनी त्यांना टोमणे मारले, की ते चांगले वडील नाहीत आणि ते मुलीच्या कमाईवर जगतात, असे सांगितले.
हे ही वाचा:
शिंदेंच्या ‘बॉक्सर’ आमदारावर कारवाई सुरु, गुन्हा दाखल!
‘छांगुर बाबा’ला मुस्लिम देशांकडून धर्मांतरासाठी मिळाले ५०० कोटी रुपये!
भाजपने टी राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला!
यूकेचे एफ-३५ जेट पुढील आठवड्यात घरी परतण्याची शक्यता!
गावकऱ्यांनी असा दावा केला की राधिका तिच्या मनाने काहीही करते आणि दीपक यादव तिला नियंत्रित करू शकत नाहीत.
राधिकाने दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका दुखापतीनंतर टेनिस खेळणे थांबवले होते आणि त्यानंतर ती एक टेनिस अकॅडमी चालवत होती. तसेच तिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनायचे होते. ती प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर एल्विश यादवमुळे प्रेरित होती आणि एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती.
गावातून परतल्यानंतर दीपकने राधिकाशी अनेक वेळा चर्चा केली आणि तिला टेनिस अकॅडमी बंद करण्यास सांगितले.
स्रोतांच्या माहितीनुसार, राधिकाने याला नकार दिला आणि सांगितले की दीपक यादव यांनीच तिच्या टेनिस करिअरवर 2 कोटी रुपये खर्च केले आहेत, मग अकॅडमी कशी बंद करावी?
ही गोष्ट दीपक यादव यांना खूप बोचत होती आणि ते पुढील तीन दिवस खूप त्रस्त होते. या काळात त्यांनी स्वतःचा जीव घेण्याचा विचारदेखील केला, असे समजते.
घटनेच्या दिवशी दीपक यादव यांनी पुन्हा एकदा राधिकाशी यावर चर्चा केली. नंतर ती स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना, दीपक यादव यांनी तिच्यावर गोळीबार केला. पोस्टमॉर्टेम अहवालात असे स्पष्ट झाले की, तिच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या.
घटनेच्या वेळी राधिकाची आई, मंजू यादव, घरीच होती. मात्र, तिने सांगितले की तिला ताप असल्यामुळे ती खोलीत झोपली होती आणि पतीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याची तिला कल्पना नव्हती.







