केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (४ जुलै) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुण्यातील वारजे परिसरात छापा टाकला. यादरम्यान पोलिसांनी एका तरुणाकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहेत. पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. २१ वर्षीय सागर मुंडे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) येथे आज थोरले बाजीराव पेशवे यांच्या घोडेस्वार पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले. या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी सभेला संबोधितही केले. दरम्यान, इतर अनेक कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होणार आहेत.
अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. एनडीए कॅम्पसमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला आहे, ज्याचे आज अनावरण झाले. गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशिक्षणार्थी कॅडेट्स आणि लष्करी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
हे ही वाचा :
त्रिनिदाद-टोबॅगोच्या पंतप्रधानांना महाकुंभ-शरयू नदीचे पवित्र जल आणि राम मंदिराची प्रतिकृती भेट!
हातात हातकड्या, कडक सुरक्षा व्यवस्था, २५० घुसखोर बांगलादेशी ढाक्याला रवाना!
भाजपला पहिली महिला अध्यक्ष मिळणार?
क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक संधी!
एनडीए येथे पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर, अमित शाह कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरला भेट देणार आहेत. यासोबतच ते बाळासाहेब देवरस रुग्णालयाचीही पाहणी करतील. पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत.
