नवीन पक्षप्रमुखपदावरून निर्माण झालेल्या गतिरोधाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष (भाजपा) आपल्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षपदी एका महिलेची नियुक्ती करण्याची शक्यता आहे , असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. जेपी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपला , परंतु लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला. पक्षाचे वरिष्ठ नेते व्यापक चर्चा करत आहेत आणि निर्मला सीतारमण, डी. पुरंदेश्वरी आणि वनथी श्रीनिवासन यासारख्या नेत्यांसह अनेक प्रमुख महिला राजकारण्यांचा विचार केला जात आहे.
निर्मला सीतारमण
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, भाजपला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळू शकते. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी अलीकडेच पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे सरचिटणीस (संघटना) बीएल संतोष यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण भारतीय असल्याने आणि पक्षाचा आणि मोदी सरकारचा एक प्रसिद्ध चेहरा असल्याने त्या पक्षाच्या महिलांमध्ये पहिली पसंती असू शकतात, असा युक्तिवादही केला जात आहे.
डी पुरंदेश्वरी
सीतारामन यांच्याव्यतिरिक्त दुसरे नाव माजी केंद्रीय डी पुरंदेश्वरी यांचे आहे. त्या या पदासाठी एक प्रबळ दावेदार असल्याचेही म्हटले जाते. त्या भाजपच्या आंध्र प्रदेशच्या माजी प्रदेशाध्यक्षा राहिल्या आहेत. पुरंदेश्वरी अनेक भाषांमध्ये पारंगत आहेत. राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ बहुपक्षीय शिष्टमंडळासाठी पुरंदेश्वरीची निवडही झाली होती.
हे ही वाचा :
क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक संधी!
राज्यात थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानाधारित ₹१.३५ लाख कोटी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी!
नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश!
वनथी श्रीनिवासन
त्याच वेळी, संभाव्य महिला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विचारात घेतले जाणारे तिसरे नाव वनथी श्रीनिवासन आहे. त्या तमिळनाडूच्या आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या श्रीनिवासन सध्या राज्य विधानसभेत कोइम्बतूर दक्षिणचे प्रतिनिधित्व करतात. वनथी या १९९३ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या. तेव्हापासून त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्या तमिळनाडूच्या राज्य सचिव, सरचिटणीस आणि उपाध्यक्षाही राहिल्या आहेत. २०२० मध्ये पक्षाने त्यांना महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त केले. २०२२ मध्ये त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या तमिळ महिला आहेत.
