भारत येत्या काळात एक लाख कोटींची संरक्षण सामुग्री विकत घेणार आहे. डीफेन्स एक्विझिशन काऊंसिलच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा निर्णय जाहीर केला. हा आकडा लहानसहान नाही. डॉलरच्या परीभाषेत सांगायचे तर ही रक्कम सुमारे १२ अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे. म्हणजे पाकिस्तानच्या ताज्या डीफेन्स बजेटपेक्षा तीन अब्ज डॉलर जास्त. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने जाहीर केलेला खरेदीचा हा पहीला मोठा आकडा. ऑपरेशन सिंदूरमधील काही अनुभवानंतर हे शहाणपण आलेले आहे. I STAR टेहळणी विमानांबाबत तर हे निश्तितपणे सांगता येईल.
