28 C
Mumbai
Wednesday, June 29, 2022
घरक्राईमनामाराज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

Related

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने राज कुंद्राविरुद्ध पॉर्न रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी जुलै २०२१ मध्ये अटक केली होती. राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. मात्र आता ईडीने राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ईडीकडून लवकरच राज कुंद्राला समन्स बजावण्याची शक्यता आहे. ईडी सध्या राज कुंद्रा आणि प्रकरणातील इतर आरोपींच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करत आहे. त्यामुळे लवकरच ईडीकडून या प्रकरणाशी संबंधित सर्वांना चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे.

जुलैमध्ये राज कुंद्राच्या अटकेपूर्वी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये या प्रकरणात पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींवर कथितरित्या अश्लील चित्रपट बनवले जात होते आणि वेब सीरिज किंवा बॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका देण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली जात होती. महत्त्वाकांक्षी मॉडेल आणि अभिनेत्यांना चित्रपटातील भूमिकांचे आश्वासन देण्यात आले आणि हे अश्लील चित्रपट करण्यास सांगितले गेले, असा आरोप त्यांच्यावर आहे.

हे ही वाचा:

दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण

पॉर्न रॅकेट प्रकरणात राज कुंद्रासोबत त्यांच्या कंपनीचे आयटी प्रमुख रायन थॉर्प यांनाही अटक करण्यात आली होती. राज कुंद्राची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटका झाली होती. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, लवकरच राज कुंद्राला ईडी चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,941चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
11,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा