इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यात मृत पावलेला राजा रघुवंशीच्या आईने अनेक दावे केले आहेत. या प्रकरणानंतर त्यातील कथित आरोपी आणि राजा रघुवंशीची पत्नी सोनम हिला अटक करण्यात आली आहे. त्यावर रघुवंशीची आई म्हणते की, मुलाचा खून करणाऱ्या सोनमला फाशी द्या!
उमा रघुवंशी यांनी म्हटले आहे की, खरे तर, राजा लग्नासाठी तयार नव्हता. त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, सोनम त्याच्यात फारसा रस घेत नाही. पण मात्र, लग्नाची तयारी झाली असल्यामुळे, आईनेही फारसा आग्रह केला नाही आणि लग्न पार पडलं.
हे ही वाचा:
‘या’ मार्गावर लोकल गाड्यांची संख्या वाढवावी
२०२५ मध्ये फॉर्म १६ दिसणार वेगळा
महाराष्ट्रात महायुती मजबूतपणे निवडणूक लढवेल
ICC न्यायाधीशांवर निर्बंध : इराणने केला निषेध
मेघालय ट्रिप सोनमनेच आखली
उमा म्हणतात, “सोनमनेच एकट्या ट्रिपची कल्पना दिली होती. राजा तयार नव्हता. तिने one-way तिकीट स्वतः बुक केलं, परत येण्याचं काहीही नियोजन नव्हतं. राजाने जेव्हा आईला सांगितलं, तेव्हा तिने समजूत घालत म्हटले, “एक छोटं सहल समजून जा. सोनमने राजाला महागडे दागिने घालायला लावले होते, ज्याची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचा उमा यांचा दावा आहे. त्यामुळे आता पोलीस याकडे लूटमार किंवा आर्थिक कारणांसाठी खून करण्याच्या शक्यतेतूनही पाहात आहे.
राजाच्या आईने केली सीबीआय चौकशीची मागणी
उमा यांनी असे म्हटले की, माझा मुलगा इतका प्रेमळ होता… मला अजूनही विश्वास बसत नाही की सोनमनेच हे केलं. त्या CBI चौकशीची मागणी करत आहेत, कारण प्रकरणात अनेक गूढ बाजू आहेत. या प्रकरणात ५ आरोपींना अटक झाली आहे, त्यात सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांचा समावेश आहे. प्रकरणावर मेघालय, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलीस एकत्रित काम करत आहेत. हत्येचे आर्थिक, भावनिक आणि वैयक्तिक कारणे तपासात आहेत.







