आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी फॉर्म १६ सर्व वेतनभोगी कर्मचाऱ्यांना १५ जूनपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या बदलांमुळे या वर्षीचा फॉर्म १६ अनेक नव्या बाबींनी परिपूर्ण असणार आहे.
– यंदा फॉर्म १६ मध्ये हे मुख्य बदल पाहायला मिळतील: इतर स्रोतांमधून मिळालेल्या उत्पन्नावर टीडीएस (Tax Deducted at Source) आणि काही विशिष्ट खर्चांवर टीसीएस (Tax Collected at Source) यांचा तपशील फॉर्म १६ मध्ये असेल. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या नियोक्त्याला फॉर्म १२BB-A सादर केला असेल. केंद्र सरकारने केलेल्या नवीन कर नियमांनुसार, वेतनधारक व्यक्तीला आपल्या नियोक्त्याला आपल्या इतर उत्पन्नाचे व खर्चांचे तपशील सांगता येतील, जेणेकरून टीडीएस आणि टीसीएसची योग्य समायोजन (adjustment) केली जाईल. यामुळे कर सवलतीचा लाभ मिळेल आणि वेतनातून टीडीएसची रक्कम कमी होईल.
हेही वाचा..
भगवान बिरसा मुंडा यांचे त्याग आणि समर्पण प्रेरणादायी
भगवान बिरसा मुंडा यांना झारखंडमध्ये अभिवादन
‘या’ मार्गावर लोकल गाड्यांची संख्या वाढवावी
श्रीलंकेत डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना
– नवीन कर प्रणालीतील मुख्य फायदे:
नवीन कर पद्धतीत आता स्टँडर्ड डिडक्शन ₹५०,००० वरून ₹७५,००० करण्यात आली आहे. जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली असेल, तर फॉर्म १६ मध्ये ₹७५,००० चा स्टँडर्ड डिडक्शन दिसेल. परंतु जर कोणी जुनी कर प्रणाली निवडली असेल किंवा नवीनवरून जुनीवर स्विच केलं, तर फक्त ₹५०,००० चाच डिडक्शन मिळेल.
– एनपीएस वरील कर लाभातही बदल:
नवीन कर प्रणाली अंतर्गत सेक्शन 80CCD(2) नुसार, कर्मचारी मूल वेतनाच्या १४% पर्यंत कर सवलत घेऊ शकतात, जे नियोक्त्याच्या एनपीएस योगदानावर लागू होते. जुनी कर प्रणाली निवडल्यास, ही सवलत फक्त १०% पर्यंत मिळते. फॉर्म १६ मध्ये ही सवलत फक्त नवीन कर प्रणाली निवडल्यास दाखवली जाईल.
– कर प्रणाली बदलल्यास काय होईल?
आयटीआर भरताना जर तुम्ही नवीन कर प्रणालीवरून जुनीवर स्विच केलात, तर संबंधित कर सवलती कमी होतील – विशेषतः एनपीएसवरील. थोडक्यात, २०२५ पासून फॉर्म १६ अधिक पारदर्शक आणि विस्तृत होणार असून, कर्मचाऱ्यांनी फॉर्म १२BB-A वेळेवर सादर करून आणि योग्य कर प्रणाली निवडून अधिक कर लाभ मिळवता येऊ शकतात.
