33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामा... त्याने शिवसेना आमदारालाच सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा केला प्रयत्न

… त्याने शिवसेना आमदारालाच सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा केला प्रयत्न

Related

एका शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. तक्रारदार यांनी प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. चॅटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदार साहेबांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.

काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल केला. महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली. फोन कट होताच आमदारांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ पाठवला.आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने आमदाराकडे ५० हजारांची मागणी केली होती. जर हे पैसे दिले नाहीत तर सदर व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

घरगुती कामगारांचा एका वर्षात तयार होणार अहवाल

अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

 

या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलिसांत तक्रार दिली, त्यानंतर आरोपीचा भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले. लवकरत या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

भरतपुरचे अधीक्षक बिष्णोई यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, सिक्री पोलिस ठाण्याचे पूरण चंद आणि मुंबईचे पोलिस अधिकारी खेत्रे यांनी त्या आरोपीला अटक करण्यासाठी योजना आखली. त्यानुसार त्या आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा