29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषउत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी

उत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशात चित्रपट उद्योग उभारण्याच्या दिशेने आता ठोस पाऊल पडत असून मंगळवार २३ नोव्हेंबरला यासंदर्भात निविदा उघडण्यात येणार होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प असून त्यासाठी ते मुंबईतही आले होते. तेव्हा बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेऊ दिले जाणार नाही, असे इशारे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांकडून दिले जात होते.

यमुना एक्स्प्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या माध्यमातून (यिडा) जागतिक निविदा मागविण्यात आली असून त्यात १० हजार कोटींचा हा प्रकल्प असल्याचे स्पष्ट होत आहे. तीन वेगवेगळ्या टप्प्यांत हा प्रकल्प उभा राहणार आहे.

उत्तर प्रदेशातील ही पहिलीच चित्रसृष्टी असेल तर देशातील ही तिसरी चित्रपट सृष्टी उभी राहणार आहे. मुंबई आणि हैदराबादमध्ये अशी चित्रसृष्टी आहे. त्यातील मुंबईच्या चित्रपट उद्योगाला बॉलीवूड असे म्हटले जाते.

उत्तर प्रदेशातील ही चित्रसृष्टी जेवर येथील विमानतळ आणि यमुना एक्स्प्रेसवे अशा दोघांना जोडणारी असल्यामुळे तिथे पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

या प्रकल्पासाठी निविदा २३ नोव्हेंबरला उघडण्यात येणार असल्या तरी तो प्रकल्प कुणाला दिला जाईल हे ८ डिसेंबरला निश्चित होईल.

पुढील वर्षी जानेवारीच्या मध्यात या प्रकल्पाला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी विकसकावर शिक्कामोर्तबही तेव्हाच होईल. पण पुढील वर्षी निवडणुका असल्यामुळे प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्यास विलंब होऊ शकतो.

 

हे ही वाचा:

एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

घरगुती कामगारांचा एका वर्षात तयार होणार अहवाल

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

 

या चित्रसृष्टीची ही वैशिष्ट्ये असतील-

  • या चित्रसृष्टीमुळे ५० हजार नोकऱ्या उपलब्ध होतील
  • १७ हजार कोटींची गुंतवणूक
  • २०२२ला प्रकल्पाला सुरुवात
  • २०२९पर्यंत प्रकल्पाची पूर्ती
  • पहिल्या टप्प्यात २५०० कोटी, दुसऱ्या टप्प्यात २७०० कोटी तर तिसऱ्या टप्प्यांत २१०० कोटी असा खर्च अपेक्षित आहे.
  • १ हजार एकरमध्ये चित्रसृष्टी उभी राहणार
  • फिल्म स्टुडिओसाठी २० एकर, फिल्म सुविधांसाठी ७४० एकर आणि फिल्म इन्स्टिट्युटसाठी ४० एकर, मनोरंजन पार्कसाठी १२० एकर जमीन वापरली जाणार आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा