28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाअमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी 'नशेत'

अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’

Google News Follow

Related

मुंबईमध्ये सध्याच्या घडीला अनेक झोपडपट्ट्या या अमली पदार्थ विक्रीचे केंद्र बनलेल्या आहेत. या झोपडपट्ट्यांमधून माल बनवलाही जातो आणि त्याचा व्यवहारही होतो. खासकरून मानुखुर्द आणि गोवंडी या मुंबईतील झोपडपट्टीतील अनेक तरुण सध्या याचाच मार्ग अवलंबताना दिसत आहेत. त्यामुळेच या झोपडपट्टीतील तरुणाई ही सध्या नशेच्या अमलाखाली असल्याचे निदर्शनास येत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने २७ वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून २३.७७ लाख रुपये किंमतीच्या ७९०० बाटल्या कफ सिरपच्या जप्त केल्या गेल्या. ‘कोडीन फॉस्फेट’ नावाचे सरबत मुंबई आणि त्याच्या उपनगरातील झोपडपट्टीतील लोकांसाठी व्यसन बनले आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मानखुर्द परिसरात धाड टाकून संबंधित व्यक्तीला पकडण्यात आलेले होते. यातील सर्वात मुख्य बाब म्हणजे, अमली पदार्थ विकत घेण्यासाठी, अनेक तरुण भुरटे चोर बनू लागले आहेत. त्यामुळे विभागामध्ये नशेचा बाजार तर वाढत आहेच. शिवाय भुरटे चोरही दिवसागणिक वाढू लागलेले आहेत. गोवंडीच्या क्षेपणभूमीसह खाडीचा परिसर, शिवाजी आगारामागील जागा, आंबेडकर मैदानाचा परिसर तसेच मानखुर्द उड्डाणपुलाचे क्षेपणभूमीकडील टोक या ठिकाणी नशा करणारे एकत्र जमतात.

 

हे ही वाचा:

डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, ६० घरं जाळली

भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार!

विद्यार्थ्याला ‘ढ’ म्हटल्यामुळे त्या प्राध्यापकाची झाली हत्या?

 

मानखुर्द तसेच गोवंडीयेथील स्मशानभूमी येथेही नशा करणार जमतात असे निदर्शनास आलेले आहे. नशेत धुंद असणारे हे तरुण जवळ धारधार शस्त्र बाळगतात. त्यामुळे त्यांना रोखण्यासही कुणाची हिंमत होत नाही. व्हाईट इंक सोल्युशन, कफ सिरप, गांजा, एमडी आदी अमली पदार्थांचे सेवन येथील तरुण करतात. ट्रॅम्बे, चिता कॅम्प येथील भागात अमली पदार्थांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलिसांनाही नशेखोरांवर अंकुश ठेवणे कठीण जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा