31 C
Mumbai
Monday, August 31, 2026
घरक्राईमनामासमृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

समृद्धीवर १८ लाखांचा दरोडा; वकिलाला लुटले

कार अडवून टोळीचा हल्ला

Google News Follow

Related

नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एका वकिलाची कार जबरदस्तीने थांबवून ११ ते १२ अज्ञात व्यक्तींच्या टोळीने वकील आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून १८.०९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

ही घटना गुरुवारी रात्री सिन्नर तालुक्यातील मालधोन शिवाराजवळ घडली. राजेंद्र प्रसाद मिश्रा (३७) हे पत्नी, भाऊ आणि दीड वर्षाच्या मुलासह छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे कारने प्रवास करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांच्या टोळीने कारच्या समोर लोखंडी वस्तू फेकली, ज्यामुळे कारचा पुढील टायर फुटला. त्यानंतर टोळीने कारला घेराव घातला आणि मिश्रा तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. मौल्यवान वस्तू दिल्या नाहीत तर दीड वर्षाच्या मुलाला ठार मारण्याची धमकीही दरोडेखोरांनी दिली.

हे ही वाचा: 

एव्हरेस्ट, लालजी गोधू हिंगावर बंदी

मी विकेट घेणारा गोलंदाज आहे!

समय रैनाच्या ‘लेटेंट’मधील जोक्सवरून वाद

रेल्वेच्या १२ स्पेशल गाड्या नोव्हेंबरपर्यंत धावणार

त्यानंतर टोळीने कुटुंबाकडील अंगठ्या, हार, बांगड्या आणि कानातल्यांसह २७.८ तोळे सोन्याचे दागिने तसेच ८४,५०० रुपये रोख रक्कम लुटून घटनास्थळावरून पळ काढला.

याच टोळीने दुसऱ्या एका वाहनातील प्रवाशांनाही लाकडी काठ्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटल्याचा आरोप आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या दुसऱ्या घटनेचा तपशील अद्याप उपलब्ध नाही.

तक्रारदाराने दरोडेखोरांचे वर्णन ३० ते ३५ वर्षे वयोगटातील हिंदी भाषिक व्यक्ती असे केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पीटीआय.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा