मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ‘मोठ्या प्रमाणात पैसे देऊन’ मनसुख हिरेन यांचा खून करायला सांगितले. असं राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून आरोपपत्रामध्ये लिहण्यात आले आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेऊन आपण अजूनही ‘सुपर कॉप’ आहोत हे वाझेला सिद्ध करायचं होतं असंही या आरोपपत्रामध्ये लिहिलं आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणारे शर्मा आणि सचिन वाझे हे एकेकाळचे पोलीस दलातील सहकारी होते. वाझेप्रमाणेच शर्मा यांचाही शिवसेनेशी संबंध राहिला आहे. प्रदीप शर्मा यांनी २०१९ साली शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
अंबानींच्या घराबाहेर सापडललेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीसोबतच एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीसुद्धा आढळून आली होती. या इनोव्हाशी संबंधित सीसीटिव्ही चित्रणही समोर आले होते. शनिवारी रात्री पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीतून पांढऱ्या रंगाचा पीपीई किट घातलेली एक व्यक्ती उतरली होती. ही व्यक्ती म्हणजेच एपीआय सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?
अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार
संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री
बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ
मनसुख यांना तावडे नावाच्या व्यक्तीने रात्री ८ वाजून ३२ मिनिटांनी फोन केला. फोन केल्यानंतर मनसुख रिक्षाने ठाण्यातील खोपट परिसरातील विकास पाल्मस आंबेडकर रस्त्यावरून गेले. मनसुख यांच्याकडे स्वत:ची कार आणि तीन मोटरसायकल असताना देखील त्यांनी रिक्षाचा वापर केला. त्याच दिवशी मनसुख यांच्या पत्नीने रात्री ११ वाजता फोन केला असता फोन बंद होता. मनसुख यांच्याकडे एक मोबाईल होता. ज्यामध्ये दोन सिमकार्ड होते. एटीएसने त्या दोन्ही क्रमांकाचे सीडीआर काढले तेव्हा त्यामध्ये मनसुख यांना शेवटचा फोन हा ८ वाजून ३२ मिनिटांनी आला होता. त्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी चार मेसेज आले होते. चारही मेसेज आले तेव्हा त्यांचे लोकेशन वसई येथील मालजीपाडा दाखवत आहे. या सर्व घटनाक्रमानंतर एटीएसला अंदाज आहे की, मनसुख यांचे रात्री ९ च्या सुमारास अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकण्यात आला.







