35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार

अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार

Google News Follow

Related

इराणच्या धर्तीवर स्थापन करण्यात येत असलेल्या तालिबानच्या सरकारने आपला अजेंडा जाहीर केला आहे. यापुढे अफगाणिस्तानमध्ये  शरिया कायदा लागू करणार असल्याची घोषणा तालिबानच्या नव्या सरकारने केली आहे. देशात इस्लामिक नियम आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील असं तालिबानच्या नव्या सरकारचा प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याने स्पष्ट केलं आहे.

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याने एका इंग्रजी प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे की, “अफगाणिस्तानमधील नवीन सरकार हे शांती, समृद्धी आणि विकास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. लोकांनी हा देश सोडून जाऊ नये. इस्लामिक अमिरातमध्ये यापुढे कुणालाही कसलीही समस्या येणार नाही. या युद्धग्रस्त देशाची पुनर्बांधणी करण्यात येईल.”

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांची तालिबानच्या नव्या सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा गेल्या वीस वर्षांपासून तालिबानमध्ये महत्वाची भूमिका बजावतोय. तालिबानशी संबंधित महत्वाचे निर्णय घेणाऱ्या ‘रहबारी शूरा’ चा तो प्रमुख आहे. एका धार्मिक नेत्याच्या स्वरुपात त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.  या आधी प्रमुख पदासाठी नाव चर्चेत असलेल्या मुल्ला अब्दुल गनी बरदारकडे आता उपपंतप्रधानपद सोपवलं जाणार आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री

बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ

आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!

राज्याने केले हात वर; महापालिकांना करावा लागणार तिसऱ्या लाटेत खर्च

हक्कानी नेटवर्कचा सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबान सरकारचा नवी गृहमंत्री असणार आहे तर तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा याकुब हा संरक्षण मंत्री असणार आहे. अफगाणिस्तानचा गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानीचे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत आहे. अमेरिकेने हक्कानीवर ५० लाख डॉलरचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा