33 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरदेश दुनियासंयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री

संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा करण्यात आलीय. ह्या सरकारची जगाला उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून ज्या अखूंदची घोषणा केलीय तो संयुक्त राष्ट्राच्या यादीत जागतिक दहशतवादी आहे तर गृहमंत्री म्हणून ज्याला घोषीत केलंय, त्याच्या डोक्यावर अमेरीकेनं मोठं बक्षिस ठेवलेलं आहे.

मुल्ला हसन अखूंद हा तालिबानचा संस्थापकांपैकी एक आहे. तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. विशेष म्हणजे यूएनची दहशतवाद्यांची जी यादी आहे त्यात मुल्ला हसन अखूंद यांचं नाव आहे. अखूंद हे तालिबानचा जिथं जन्म झाला त्या कंदहारचेच आहेत. गेली वीस वर्ष ते तालिबानसाठी कार्यरत होते. अखूंद यांची ओळख ही मिलिटरी लीडर कमी आणि धार्मिक नेता म्हणून जास्त आहे. अखूंद हे फार खळबळपणे चर्चेत असणारे नेते नाहीत पण शांत रहावून तालिबानचं त्यांनी अखंडपणे काम केलं. त्यामुळेच ते पंतप्रधानपदी पोहोचल्याचं मानलं जातंय.

हे ही वाचा:

बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ

आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!

राज्याने केले हात वर; महापालिकांना करावा लागणार तिसऱ्या लाटेत खर्च

‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मलिकांवर पलटवार

मुल्ला अब्दूल गनी बरादर हा तालिबानच्या राजकीय विंगचा प्रमुख आहे. दोह्यात जी तालिबानसह आंतरराष्ट्रीय चर्चेच्या फेऱ्या झाल्यात त्यातही बरादरची महत्वाची भूमिका राहिलीय. मुल्ला ओमरसह तालिबानची स्थापना करण्याचं श्रेय हे बरादरकडे जातं. तालिबानची ज्यावेळेसही चर्चा होते, तेव्हा मुल्ला अब्दूल गनी बरादरचे नाव चर्चेत असतेच. बरादरचा जन्म आणि वाढ ही कंदहारची. याच कंदहारमध्ये तालिबानचाही जन्म झाला. १९७० ला सोव्हिएत यूनियननं अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली. त्या एका घटनेनं अफगाण लोकांच्या एका पिढीचं आयुष्य कायमचं बदललं. असं मानलं जातं की, त्या एका घटनेमुळे अफगाणिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीवर कायमचा परिणाम झाला. त्यापैकीच एक आहे मुल्ला अब्दूल गनी बरादर. एका डोळ्यानं अधू असलेल्या मुल्ला ओमरसोबत खांद्याला खांदा लावून मुल्ला अब्दूल गनी बरादर लढल्याचं सांगितलं जातं. सोव्हिएत यूनियनं अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि यादवी माजली. त्याच अस्थिरता, गोंधळ, भ्रष्टाचाराच्या वातावरण मुल्ला ओमर आणि मुल्ला अब्दूल गनी बरादरनं तालिबानची स्थापना केली. २०१० साली मुल्ला अब्दूल गनी बरादरला पाकिस्तानच्या कराचीत अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये त्याची सुटका केली गेली. तेही अमेरीकेच्या दबावानंतर.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा