26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामा‘समीर वानखेडेंचा संबंधच नाही, फसवणूक करणारा किरण गोसावीच आहे’

‘समीर वानखेडेंचा संबंधच नाही, फसवणूक करणारा किरण गोसावीच आहे’

Related

आर्यन खान प्रकरणातल्या सॅम डिसुझाचा दावा

कॉर्डिलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घातलेला छापा आणि त्यात शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला झालेली अटक या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असताना आता या प्रकरणातील एक पात्र सॅम डिसुझाच्या मुलाखतीतून नवेच सत्य बाहेर आले आहे.

सॅम डिसुझाच्या मते या सगळ्या प्रकरणात किरण गोसावी हाच फसवणूक करणारा व्यक्ती आहे. यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॅरेक्टरच तसे नाही जसे समजले जात आहे. कारण २५ कोटीची डील वगैरे झाली की नाही झाली हे मला माहीत नाही. पण मी ज्यात होतो त्यात मला सुनील पाटील यांनी जे सांगितले तेच मी केले. उलट त्यात प्रभाकर सैल हाच या सगळ्या प्रकारात धावपळ करत होता, वावरत होता. गोसावीने तर समीर वानखेडे यांच्या नावानेच फोन सेव्ह केला होता. पण ट्रू कॉलरवर तो फोन सैलचा असल्याचे लक्षात आले. यावरून यात गोसावी हा फसवणूक करत आहे हे लक्षात आले.

एबीपी माझाने सॅम डिसुझाच्या घेतलेल्या खास मुलाखतीत त्याने या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत. त्यावरून हा सगळा २५ कोटीच्या डीलचा प्रकार गोसावीनेच घडवून आणला असण्याची शक्यता आहे.

सॅम डिसुझाने या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. तो म्हणतो की, मला सुनील पाटीलने फोन करून केला माझ्याकडे कॉर्डिलिया क्रूझबद्दल माहिती असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात कुणा एनसीबी अधिकाऱ्याशी संपर्क करण्यास सांगितले. तेव्हा त्याच्यामुळे किरण गोसावीशी माझी ओळख झाली. मला कळले की कुणी मोठा सेलिब्रिटी त्या क्रूझवर आहे. त्यानंतर मी गोसावीला भेटलो. मी त्याला प्रथम भेटत होतो. तो सेलिब्रिटी आर्यन खान असल्याचे कळले. आर्यनने गोसावीला सांगितले की, माझा पूजा ददलानीशी संवाद साधून द्या. त्याच्याकडे काही सापडलेले नाही, त्याला मदत करू असे गोसावी मला म्हणाला. मी पण मग मदत करण्याचे आश्वासन दिले. रणजित बिंद्राला मी संपर्क साधला. तो हॉटेल क्षेत्रातील होता. त्या दरम्यान मी कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्याशी कधी बोललो नाही. बिंद्राच्या माध्यमातून  आम्ही पूजाला भेटलो. तिला लोअर परळला बोलावले. तिथे भेट झाली. मी, गोसावी, मी, चिकी पांडे, पूजा ददलानी व तिचे पती होते. गोसावीकडे हे प्रकरण आहे असे मी सांगितले. नंतर गोसावी आणि ददलानी हेच बोलले. मी त्यात नव्हतो. आर्यनला मदत करण्यासाठी ५० लाख मागितल्याचे मला कळले. प्रभाकर सैल सुनील पाटीलच्या सांगण्यावरून ते पैसे घेण्यासाठी गेला. मग मला कळले की, किरण गोसावी हा यात फसवणूक करणारा आहे. तेव्हा ज्यांनी हे पैसे दिले त्यांच्याकडे दिले. ३८ लाख आम्ही दिले. नंतर ५ लाख हे रोख गुरनानी म्हणून कुणीतरी आला होता त्याला दिले. मग प्रकरण संपले.

 

हे ही वाचा:

शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?

टीम इंडियाची आज अस्तित्वाची लढाई

घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश

‘जय भीम’ चित्रपटात प्रकाश राज यांनी मारलेल्या थपडेमुळे का रागावले लोक?

 

डिसुझा म्हणतो की, एनसीबीच्या ऑफिसरने हे पैसे मागितले नव्हते. माझ्याकडे साक्षीदार आहे. असे घडलेले नाही. मी गोसावीशी बोललोच नव्हतो माझा संबंध पाटीलशी होता. तो समन्वय राखत होता. वानखेडेचे नाव एस. डब्ल्यू या नावाने गोसावीने सेव्ह केले. तो नंबर प्रभाकर सैलचा होता. हे मला ट्रू कॉलरमुळे कळले. एनसीबीचे अधिकारी पैसे मागत आहेत, हे दाखविण्यासाठी हे खोटे कुभांड रचले आहेत. सुनील पाटीलला मी सांगितले की मला अशा लोकांशी तुम्ही का भेट घालून दिली?

 सुनील पाटील कोण?

सुनील पाटील हा लायझनिंग करतो. त्याचे नोकरशहा, राजकारण्यांशी संबंध आहेत. तो धुळ्याचा आहे. १ ऑक्टोबरला सुनील पाटीलने मला फोन केला होता. मला एनसीबीशी बोलायचे आहे, असे तो म्हणाला. कॉर्डलियाची टीप द्यायची आहे. त्याने मनीष आणि किरण यांच्याशी ओळख करून दिली. मी तर या सगळ्या प्रकारानंतरही पळालेलो नाही. मी मुंबईतच आहे. शाहरुख खानशी डील झाली की नाही हे मला माहीत नाही. पण त्यांची टीम आणि किरण हे बोलत होते. सुनील पाटीलच्या आदेशावर प्रभाकर सैल काम करत होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा