33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामासत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका?

सत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका?

Related

प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

उच्च न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आपली वैयक्तीक बदनामी केली जात असून सोशल मीडियावर कुटुंबियांची खासगी माहिती उघड केली जात आहे. याबाबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करुन तीन मागण्या केल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम तपासावर होत असल्याचेही समीर वानखेडे यांनी त्यात म्हटले आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपले आहे, असे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता समीर वानखेडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का? यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा:

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यापासून आपल्याला आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार साईल यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीच्या विरोधात अनेक आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा