29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरक्राईमनामाआर्थिक चणचणीतून सुरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात सदस्यांची आत्महत्या

आर्थिक चणचणीतून सुरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात सदस्यांची आत्महत्या

सुसाईड नोट मधून कारण स्पष्ट

Google News Follow

Related

गुजरातच्या सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातल्या सात सदस्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. एकाच वेळी अनेक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

या प्रकरणी झोन ५ चे डीसीपी राकेश बारोट यांनी म्हटलं आहे की, सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सोलंकी परिवारात सात लोक राहात होते. त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या सात जणांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

कनुभाई सोलंकी आणि त्यांचे कुटुंब या घरात राहात होते. कनुभाई यांचा मुलगा मनिषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनिषची पत्नी रीटा, मनिषच्या १० आणि १३ वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तर मुलगा कुशल यांचे मृतदेह अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मिळाले, अशे अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

गाझामधील युद्धविरामाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यास भारताचा नकार

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

मनिष सोलंकी हे इंटिरियर डेकोरेशन आणि फर्निचरचं काम करत होते. सोलंकी यांच्या घरात सुसाइड नोट आणि रिकामी बाटली मिळाली आहे. या सगळ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सुसाइड नोटमध्ये हे लिहिण्यात आलं आहे उधारी चुकवता न आल्याने हे पाऊल उचललं आहे. आर्थिक चणचणीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. हे सगळे मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ‘एएनआय’ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा