32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर क्राईमनामा ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींना अटक

ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींना अटक

Related

ठाणे क्राईम ब्राँचने ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट एका खाजगी सोसायटीमध्ये सुरू होते. याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळताच त्यांनी लगेच धाड टाकून ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून ३ एजंटसह दोन अभिनेत्रींना अटक केली आहे.

ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट १ कडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. त्या एका खाजगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट चालवत होत्या. वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूडशी संबंधित आहेत. कोविड -१९ च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा:

प्रियकराच्या मदतीने पत्नीने घरातच पुरला पतीचा मृतदेह

‘तुझ्या बापाला’…किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पिटावर बंदी घाला- अमूलचे पंतप्रधानांना पत्र

धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटची लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचे समजत आहे. एका खाजगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रींची कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये एक मोठं रॅकेट असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा