29.5 C
Mumbai
Thursday, July 16, 2026
घरक्राईमनामाश्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत...खुनी आफताब मात्र शिकतोय!

श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत…खुनी आफताब मात्र शिकतोय!

आरोपीला परीक्षा देता यावी म्हणून न्यायालयात तारीख पे तारीख

Google News Follow

Related

श्रद्धा वालकरच्या लव्ह जिहाद प्रकरणाला आता चार वर्षे झाली आहेत पण अद्याप कोणताही न्याय मिळू शकलेला नाही. श्रद्धाच्या शरीराचे तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने तुकडे केले होते आणि ते नंतर वेगवेगळ्या पिशव्यांत भरून फेकून दिले. ते तुकडे अजूनही केस प्रॉपर्टी म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्या तुकड्यांना अंत्यविधीची प्रतीक्षा आहे. मात्र खुनी आफताबला न्यायालयाने शिक्षणाची परवानगी दिली आहे. या एकूणच उद्वेगजनक प्रकारामुळे समाजात प्रचंड संताप व्यक्त होतोय.

२०२२मध्ये ही घटना घडली होती. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालामध्ये २०२२ मध्ये करण्यात आलेल्या पॉलीग्राफ आणि मानसशास्त्रीय चाचण्यांदरम्यान त्याच्यात सायकोपॅथिक आणि सोशिओपॅथिक प्रवृत्ती आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्यावर आक्रमक प्रवृत्ती मापन चाचणी, आयसेन्क व्यक्तिमत्त्व चाचणी, पिक्चर फ्रस्ट्रेशन टेस्ट आणि भावनिक परिपक्वता चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये भावनिक अलिप्तता, सहानुभूतीचा अभाव आणि इतरांना नियंत्रित करण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून आली.

हे ही वाचा:

रशियन तेलावरून भारताला मोठा दिलासा!

सोन्या-चांदीच्या तेजीला अचानक ब्रेक

वर्गीस पती-पत्नी करत होते धर्मप्रसार, वारकऱ्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग

मे २०२२ मध्ये आफताब पूनावालाने आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि अनेक दिवस विविध ठिकाणी ते फेकल्याचा आरोप आहे. दरम्यान, ११ जुलै रोजी श्रद्धा वालकर यांच्या कुटुंबाच्या वकिलांनी या प्रकरणातील सुनावणी जाणूनबुजून लांबवली जात असल्याचा आरोप केला. २० जुलैला होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. या विलंबाविरोधात ते दिल्ली उच्च न्यायालयात जलद सुनावणीसाठी याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रद्धा वालकर यांच्या कुटुंबाच्या वतीने बाजू मांडणाऱ्या ऍड. सीमा समृद्धी कुशवाह यांनी सांगितले की, आफताब पूनावाला समाजशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी तिहार कारागृहातील परीक्षा केंद्रात उपस्थित राहणार असल्यामुळे २० जुलैला होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने यापूर्वी २० ते २७ जुलैदरम्यान सलग सुनावण्या निश्चित केल्या होत्या. मात्र, परीक्षेचे कारण देत आरोपीकडून अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर २० जुलैची सुनावणी रद्द करण्यात आली आणि त्यासाठी पर्यायी तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही.

श्रद्धाच्या पार्थिव शरीरावर अद्याप अंत्यसंस्कार नाहीत

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या सर्व चाचण्यांदरम्यान आफताबने आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. त्याचे संपूर्ण लक्ष स्वतःला कायदेशीर शिक्षेपासून कसे वाचवता येईल, यावरच केंद्रित असल्याचे निष्कर्ष समोर आले. कुशवाह यांनी सांगितले की, खटल्यातील विलंबामुळे श्रद्धा वालकर यांच्या कुटुंबाला अद्याप त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करता आलेले नाहीत. मृतदेहाचे अवशेष न्यायालयीन पुरावा (केस प्रॉपर्टी) असल्यामुळे खटला पूर्ण होईपर्यंत ते कुटुंबाकडे सुपूर्द करता येत नाहीत.

श्रद्धा वालकर यांच्या आईचे २०२० मध्ये निधन झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुलीच्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून ते सावरू शकले नव्हते. काही काळानंतर श्रद्धा यांच्या आजीचाही मृत्यू झाला.

सध्या श्रद्धाचा भाऊ अधूनमधून न्यायालयीन प्रक्रियेसाठी येत असला तरी, कुटुंबाच्या वतीने ऍड. सीमा समृद्धी कुशवाह या प्रकरणाची बाजू मांडत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा