29.1 C
Mumbai
Thursday, July 16, 2026
घरविशेषमुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग

मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग

वाहतूक काही काळ ठप्प

Google News Follow

Related

मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या बोगद्यात बुधवारी (१५ जुलै) धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना दक्षिण मार्गिकेच्या बोगद्यात घडली. प्रसंगावधान राखत कारमधील प्रवाशांनी वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे बोगद्यात काही काळ धुराचे मोठे लोट पसरले आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक तातडीने बंद करण्यात आली.

घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि बृहन्मुंबई महापालिकेचे (BMC) अधिकारी तातडीने दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विद्युत बिघाड किंवा इंजिनमधील तांत्रिक दोष असण्याची शक्यता तपासली जात आहे. लवकरच वाहतूक सुरळीत सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मालेगावातील SIR प्रक्रियेत ‘व्होट जिहाद’? एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद

पीओके आंदोलनात लष्कर, जैशच्या दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निष्क्रियतेमुळे यूएनवरील विश्वास ढासळतोय

पुतिन यांना अण्वस्त्र वापरण्यापासून पंतप्रधान मोदींनी रोखले!

आग लागल्यानंतर बोगद्यात दाट धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशांतील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. यामुळे कोस्टल रोडसह बोगद्यात अनेक वाहने अडकून पडली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहनांना हाजी अली आणि वरळी कनेक्टरमार्गे पर्यायी मार्गांवर वळवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा