34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामानाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले

नाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले

Google News Follow

Related

नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी गॅस गळती होऊन सहा जण भाजले आहेत. पहिली घटना इगतपुरी येथे घडली असून, तेथील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर दुसरी घटना म्हसगण येथील जांभुळपाडा येथे घटली आहे. या घटनेमध्ये चार जण भाजले आहेत.

मुनाफ शेख हे इगतपुरीमधील रहिवासी. त्यांच्या घरचा गॅस गिझर लीक होऊन ही घटना घडली. घरातील मंडळींनी नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी पाणी गरम करायला गॅस गिझर सुरु केले. अचानक आगीचा मोठा भडका उडाला. त्यामुळे मुनाफ शेख हे भाजले गेले. हे बघून त्यांचा मुलगा त्यांच्या दिशेने धावला. त्याने प्रसंगावधान राखत बाथरूमचा दरवाजा बंद केला. मात्र गॅसचा जोर इतका होता की बाथरूमच्या काचा, दरवाजा तुटला. त्यामध्ये तोही भाजला गेला.
यातील जखमी मुलावर इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुनाफ शेख हे जास्त भाजल्याने त्यांच्यावर नाशिक येथील नारायणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

हे ही वाचा:

कुठे गेले कन्याकुमारीतील हिंदू? कोण आहेत क्रिप्टो ख्रिश्चन?

अंधेरी क्रीडासंकुलात लग्नसोहळ्याच्या गर्दीत कोरोना चेंगरला

शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?

राष्ट्रवादीच्या मदतीने किल्ले लोहगडावर उरुसाचा डाव

 

गॅस भडक्याची दुसरी घटना नाशिकच्या पेठ तालुक्यातील जांभुळपाडा येथे घडली. स्वयंपाकच्या गॅस कनेक्शनची तपासणी करताना कारागिरांच्या हलगर्जीपणामुळे गॅस गळती होऊन अचानक उडालेल्या भडक्यामुळे घरातील चौघांचे पाय भाजल्याची घटना घडली आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी यांनी रहिवाश्याच्या मदतीने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्या सर्वाना तात्काळ उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत पेठ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे जबाब घेतले. वर्षभरात नाशिक मध्ये गॅस गळतीमुळे तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा