28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरक्राईमनामासलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या

सलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या

रेकी करण्यासाठी केली होती मदत

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता, याप्रकरणी तपास सुरू असून यात आता नवा अपडेट समोर आला आहे. सलमान खान याच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हरियाणा येथील फतेहाबादमधून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हरपाल सिंग (वय ३७ वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी हरियाणामधून हरपाल सिंग याला बेड्या ठोकल्या आहेत. ३७ वर्षीय हरपाल सिंगमे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपीला म्हणजेच मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती. शिवाय रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला मंगळवार, १५ मे रोजी विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

यापूर्वी ७ मे रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून या प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली होती. राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे आहे. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती.

१४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली होती.

हे ही वाचा:

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!

पीओकेमधील निदर्शनांपुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले; निधी देण्याची घोषणा

पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात असणारा नांदेडमधून ताब्यात

पंतप्रधान नव्हे, राहुल गांधी यांच्यासोबत वादविवादासाठी भाजपकडून रायबरेलीतील तरुण नेत्याची निवड

अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिश्नोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती पुढे या प्रकरणात आणखी दोघांना पंजाबमधून मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. यांनी शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजस्थानमधून एकाच्या मुसक्या आवळल्या होत्या. यातील अनुज थापन याने तुरुंगातचं चादरीने गळफास घेत आत्महत्या केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा