31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरराजकारणराहुल गांधी भाजपाच्या अभिनव प्रकाश यांच्याशी 'डिबेट' करून दाखवा!

राहुल गांधी भाजपाच्या अभिनव प्रकाश यांच्याशी ‘डिबेट’ करून दाखवा!

Google News Follow

Related

भाजपने सोमवारी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबत सार्वजनिक वादविवादासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘राजकीय वंशज आणि सामान्य तरुण यांच्यातील हा एक समृद्ध वादविवाद असेल,’ असे राहुल गांधींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात कर्नाटक भाजपचे नेते तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे.

काही सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादविवादासाठी व्यासपीठावर आमंत्रित केल्यानंतर एक दिवसानंतर ही घोषणा झाली. राहुल गांधी यांनी निमंत्रण स्वीकारले आणि पंतप्रधानांनी त्यात सहभागी व्हावे, अशी देशाची अपेक्षा असल्याचेही सांगितले. तथापि, भाजपने चर्चेचे निमंत्रण नाकारले. राहुल गांधींबाबत काँग्रेसमध्येही विश्वासार्हता नाही आणि त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्याशी वाद घालण्याचे कारण नाही, असे कारण त्यांनी दिले.

‘प्रिय राहुल गांधी जी, भारतीय जनता युवा मोर्चाने आगामी वादविवादासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना युवा मोर्चाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. स्वातंत्र्यापासून प्रदीर्घ काळ भारतावर राज्य करणारे राजकीय घराण्याचे वंशज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारताचे प्रतिनिधीत्व करणारा एक सामान्य नागरिक यांच्यात ऐतिहासिक वादविवाद होण्याचा टप्पा निश्चित करून आम्ही तुमच्या स्वीकृतीची आतुरतेने अपेक्षा करतो,’ असे सूर्या यांनी पत्रात नमूद केले आहे.

अभिनव प्रकाश हे पासी (अनुसूचित जाती) समुदायातील तरुण आणि शिक्षित नेते आहेत. रायबरेलीत हा समाज सुमारे ३० टक्के आहे, असे त्यांनी नमूद केले. अभिनव प्रकाश यांनीही ‘राहुल गांधी या वादविवादाला सहमती देतील, याची मी वाट पाहत आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘एक्स’वर दिली आहे.

‘माझी निवड केल्याबद्दल तेजस्वी सूर्या मी तुमचा आभारी आहे. आता वादविवादासाठी राहुल गांधींकडून सहमतीची मी वाट पाहात आहे. लोकशाही, राज्यघटना, सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतर्गत रोजगार या सर्व मुद्द्यांवर खुली चर्चा होऊ द्या,’ असे ट्वीट प्रकाश यांनी केले. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर लगेचच सूर्या म्हणाले की, पक्ष भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रवक्त्याला त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नियुक्त करू शकतो, परंतु पंतप्रधानांना नाही.

हे ही वाचा:

‘भारतीय सैन्यात दोन प्रकारचे शहीद आहेत’

एस जयशंकर यांचा व्हिडीओ चक्क चीनच्या राजदूतांनी केला शेअर

‘पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांनी तिकडं जा, भीक मागून खा’

जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

‘राहुल गांधी कोण आहेत, ज्यांच्याशी पंतप्रधान मोदींनी वादविवाद करावा? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत. ‘इंडि’ आघाडीला सोडा, त्यांनी आधी स्वत:ला काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करू द्या. त्यांच्या पक्षाच्या पराभवाची त्यांना जबाबदारी घेऊ द्या. नंतर पंतप्रधानांना चर्चेसाठी आमंत्रित करा, तोपर्यंत आमचे भाजप युवा मोर्चाचे प्रवक्ते कोणत्याही वादविवादासाठी तयार आहोत,’ असे तेजस्वी सूर्या म्हणाले. आदल्या दिवशी, राहुल गांधींसोबत वादविवादाचे आमंत्रण स्वीकारण्याचे पंतप्रधान मोदींनी अद्याप धाडस दाखवलेले नाही, असा दावा काँग्रेसने केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा