31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाआईची हत्या करून हृदय खाल्ले

आईची हत्या करून हृदय खाल्ले

Google News Follow

Related

कोल्हापुरात नराधमाला फाशीची शिक्षा

आईची हत्या करून काळीज कापून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कूचकोरवी असं नराधम मुलाचं नाव आहे. ऑगस्ट २०१७ साली कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून सुनील याने घरामध्येच आईची निर्घुण हत्या केली. त्यानंतर सुनीलनं धारदार शस्त्राने आईचे एक एक अवयव धडापासून वेगळे केले.

इतकच नाही तर आईचं काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्न देखील सुनील याने केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील रात्रभर आईच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सहा जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.

हे ही वाचा:

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या खडसेंची तब्येत बिघडली

आज सत्र न्यायाधीश जाधव यांनी ही दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची घटना असल्याचे नमूद करत करत आरोपी सुनील याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसंच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय.दरम्यान आरोपी सुनील याला शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहाकडे घेऊन जात असताना त्याचं चित्रीकरण करणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना, त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा