30 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरक्राईमनामाअरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

Google News Follow

मास्क लावला नाही या कारणामुळे नागपूरच्या पारडी परिसरात पोलिसांच्या मारहाणीत एका दिव्यांग दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मनोज ठवकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी केवळ मास्क लावला नाही या कारणामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे.

मनोज ठवकर हे बुधवारी संध्याकाळी काही कामानिमित्ताने बाजाराला गेले होते. तिथून ते परत घरी येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी लावून मद्यधुंद चालक आणि मास्क संदर्भातली कारवाई सुरू होती.

पोलिसांनी मनोज यांना थांबण्याचा इशारा केल्यानंतरही मनोज आपली दुचाकी घेऊन पुढे गेले. त्यामुळे त्यांच्या दुचाकीची धडक एका पोलीस कर्मचाऱ्याला बसली. त्यानंतर रागावलेल्या पोलिसांनी मनोज ठोकर यांना त्या ठिकाणीच मारहाण केली. थोड्या वेळाने पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मनोज यांना पुन्हा मारहाण केली गेली. याच मारहाणीमध्ये मनोज ठवकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि पारडी परिसरातील नागरिकांनी केला आहे.

पोलीस स्टेशनमध्ये मनोज निपचित पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले होते. नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करणे सुरु केल्यानंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. सध्या या परिसरात परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.

हे ही वाचा:

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या खडसेंची तब्येत बिघडली

दहावीच्या शिक्षकांना आता जुंपणार निवडणुकांसाठी

मनोज ठवकर यांचा मृत्यू कसा झाला याविषयी पोलीस अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. या घटनेमुळे नागपूर पोलिसांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा