29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामासोनाली फोगाट यांना मित्रांनी काहीतरी पाजले

सोनाली फोगाट यांना मित्रांनी काहीतरी पाजले

गोवा पोलिसांनी समोर आणली खळबळजनक माहिती

Google News Follow

Related

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आली असून सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या दोघांवर संशय व्यक्त केला जात आहे. फोगाट यांच्या भावाने आपल्या बहिणीचा मृत्यू संशयास्पद असून तिचा खून झाला असल्याची तक्रार केलेली आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाट या गोव्याच्या रेस्टॉरन्टमधून सुधीर सांगवान याच्यासह बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. त्यांना चालता येणेही कठीण असल्याचे त्यात दिसते आहे. त्यांच्यासोबत सुखविंदर सिंग हादेखील दिसतो आहे. कर्लीस रेस्टॉरन्टमधून हे तिघेही सोमवारी रात्री आपल्या हॉटेलकडे जात असल्याचे दिसते आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी फोगाट या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या पण तिथे त्यांना मृत असल्याचे घोषित करण्यात आले.

पोलिसांनी याबाबत सांगितले की, सुधीर सांगवानने सोनाली यांना काहीतरी प्यायला दिले हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते आहे. त्यानंतर ग्रँड लिओनी या हॉटेलवर ते गेले. सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक निदान झाले होते. पण आता त्यातील वेगळी तथ्ये बाहेर येत आहेत.

सोनाली फोगाट यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यात त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचेही आढळले होते. पोलिसांनी म्हटले आहे की, इतर चाचण्या आणि व्हिसेराची चाचणी केल्यानंतर सगळे स्पष्ट होऊ शकेल. हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भातही विचार करता येईल, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे. सोनाली फोगाट या हरयाणाच्या भाजपा नेत्या होत्या.

हे ही वाचा:

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

बालवाड्यांची माहिती मिळणार एका क्लिकवर

अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल

लफडीच लफडी चहूकडे, गं बाई गेला पाटकर कुणीकडे???

 

सोनाली फोगाट यांच्यावर बलात्कार झाला असल्याचा आरोपही त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे, पण अद्याप पोलिसांना तशी कोणतीही माहिती त्यासंदर्भात मिळालेली नाही.

सोनाली फोगाट यांचे बंधू रिंकू ढाका यांनी म्हटले आहे की, सोनाली फोगाट यांची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी आणि त्यांचे राजकीय करिअर उद्धवस्त करण्यासाठी त्यांचा काटा काढला गेला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा