32 C
Mumbai
Tuesday, March 3, 2026
घरक्राईमनामाNEET परीक्षेतील अपयशाने मुलाचा मृत्यू; वडिलांनीही संपवलं आयुष्य !

NEET परीक्षेतील अपयशाने मुलाचा मृत्यू; वडिलांनीही संपवलं आयुष्य !

NEET मधून बाहेर पडण्याची तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Google News Follow

Related

मेडिकलच्या नीट परीक्षेत (NEET Exam) अपयश आल्याने एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.मुलाच्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी राहत्या घरात वडिलांचा मृतहेद आढळून आला. आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दावा केला की, काही महिन्यांत तामिळनाडू राज्य नीट परीक्षेतून बाहेर पडेल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत चेन्नईमधील जगदिश्वरन हा विद्यार्थी मेडिकल परीक्षेत नापास झाला. जगदिश्वरनने नीट परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले मात्र दोन्ही वेळेस त्याला अपयश आले.वडिलांनी त्याला शनिवारी फोन केला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याचा घरात त्याचा मृतदेह आढळून आला.अचानक झालेल्या मुलाच्या मृत्यू मुळे वडिलांच्या मनावर आघात झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जगदिश्वरनचे वडील सेल्वसेकर मृतावस्थेत आढळले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने सेल्वसेकर यांनी राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीत फुटीचे कारण म्हणजे ईडीची कारवाई, शरद पवार !

शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !

सहा वर्षांत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली

समान नागरी कायदा आणणे म्हणजे हिंदू कोड बिल लादणे नव्हे !

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं आहे. त्यांनी आवाहन केलं आहे की, परीक्षेत यश-अपयश येत असते मात्र, विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, स्वत:वर विश्वास ठेवा आणि आयुष्य जगा. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितलं आहे की, ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण पाहता, सरकार राज्य नीट परीक्षेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. विद्यार्थ्याच्या मार्गातील अडथळा ठरणारी तामिळनाडू परीक्षेतून बाहेर पडेल. तामिळनाडू सरकार यासाठी प्रयत्नशील असून काही महिन्यांत नीट परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तामिळनाडू विधानसभेने २०२१ मध्ये, नीट मधून बाहेर पडण्यासाठी विधेयक मंजूर केलं. नीट परीक्षा खाजगी प्रशिक्षण घेऊ शकणार्‍या श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी असून आणि गरीब कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही त्यांना मेडिकल अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नाही, असं सरकारनं म्हटलं होतं.

राज्यपालांवर आरोप
तामिळनाडू सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेतून बाहेर पडण्यासाठी विधेयक पारीत केलं होतं. विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश मिळावा, यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं आहे. दरम्यान, हे विधेयक राज्यपाल आर एन रवी यांच्याकडून राष्ट्रपतींकडे पाठवण्यात उशीर झाला आणि त्यामुळे हे प्रकरण अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा