24 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरक्राईमनामा‘असा मुलगा मेलेलाच बरा...’

‘असा मुलगा मेलेलाच बरा…’

उत्तर प्रदेश पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पित्याचा उद्वेग

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश पोलिस भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी एसटीएफने नीरज यादव याला अटक केली आहे. तो बलिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. याबाबत त्याचे वडील हरिराम यादव यांना विचारले असता, त्यांनी संताप व्यक्त केला. ‘त्याला फाशीची शिक्षा होऊ दे. असा मुलगा मरू दे. त्याच्या मुळे आमची नाचक्की झाली,’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

नीरजच्या वडिलांनी स्पष्टच शब्दांत सांगितले की, मी गैरकृत्याला पाठिंबा देणार नाही. आम्ही आता त्याचे पालक नाही. आमची सर्व प्रतिष्ठा पाण्यात गेली. पोलिस भरती परीक्षेमधील पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या नीरजला स्थानिक लोक राहुल यादव यांच्या नावानेही ओळखतात. आरोपीनेही पोलिस कॉन्स्टेबल भर्ती परीक्षा दिली आहे. त्याला तीन भाऊ आणि एक बहीण आहे.

आरोपी नीरज यादव स्वतःला मर्चंट नेव्हीचा जवान असल्याचे सांगत असे. आता या प्रकरणात अटक केलेल्यांची तुरुंगात जाऊनही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लखनऊच्या कृष्णनगरमधून १८ फेब्रुवारी रोजी कॉपी करताना पकडण्यात आलेल्या सत्य अमन या विद्यार्थ्याला व्हॉट्सअपवर नीरजने पेपर पाठवला होता. त्यानंतर लखनऊ पोलिसांनी उमेदवार सत्य अमन आणि नीरजला १९ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

हे ही वाचा:

पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले

ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

नीरजकडे केलेल्या चौकशीत त्याला मथुरेतील उपाध्याय याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सांगितले होते. मात्र हा उपाध्याय कुठे राहतो, काय करतो, याबाबत त्याला काहीच माहिती नव्हती. मेसेजिंग ऍप टेलिग्रामचा स्क्रीनशॉट काही उमेदवारांनी शेअर केला होता. त्यात पेपरफुटीचा आरोप करण्यात आला होता. त्या ग्रुपचे नाव होते ‘अरुणसर रिजनिंग’. या ग्रुपवर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून १६ मिनिटांनी पेपर फुटल्याचा दावा केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा