28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषपेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!

पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडून मंडळाची पुनर्रचना जाहीर

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने पेटीएम बँकेच्या ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणखी क्रेडिट स्वीकारण्यासाठी निश्चित केलेल्या १५ मार्चच्या मुदतीपूर्वीच पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सोमवारी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याव्यतिरिक्त, पेटीएमची मूळ फर्म वन ९७ कम्युनिकेशननेही (ओसीएल) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ने त्यांच्या मंडळाची पुनर्रचना केल्याचे जाहीर केले.

विजय शेखर शर्मा हे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे अर्धवेळ नॉन-एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष होते. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्चनंतर ग्राहकांकडून ठेवी आणि क्रेडिट्स घेण्यास प्रतिबंध केल्याच्या काही आठवड्यांनंतर ही घोषणा आली आहे. ‘हे संक्रमण सक्षम करण्यासाठी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे. पीपीबीएलने आम्हाला कळवले आहे की ते नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील,’ असे ओसीएलने एका निवेदनात म्हटले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बोर्डात स्वतंत्र संचालक म्हणून रुजू झाले आहेत.

हे ही वाचा:

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले

ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’

या महिन्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांना त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँकची खाती १५ मार्चपर्यंत इतर बँकांमध्ये स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. यासाठीची पूर्वीची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२४ होती, जी आरबीआयने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन १५ दिवसांनी वाढवली आहे.

१५ मार्चनंतर पगार आणि निवृत्तीवेतनही पीपीबीएलच्या खात्यांमध्ये जमा होणार नाही. पीपीबीएलद्वारे ईएमआय किंवा ओटीटी सबस्क्रिप्शन भरणाऱ्या ग्राहकांनाही पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. १६ फेब्रुवारी रोजी, वन ९७ कम्युनिकेशन्सने पेटीएम पेमेंट्स बँकेतून त्यांचे नोडल खाते ॲक्सिस बँकेत हलवले जेणेकरून रिझर्व्ह बँकेने दिलेल्या १५ मार्चच्या मुदतीनंतरही पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स, कार्ड मशीन चालू राहील.

पेटीएमचे नोडल खाते हे एका मास्टर खात्यासारखे आहे, ज्यामध्ये त्यांचे सर्व ग्राहक आणि व्यापारी व्यवहार पूर्ण केले जातात. सध्या, पेटीएम इतर बँकांसोबत पीपीबीएलशी जोडलेला व्हर्च्युअल पेमेंट पत्ता बदलण्यासाठीही काम करत आहे, जो व्यापारी व्यवहार स्वीकारण्यासाठी वापरतात. आरबीआयने अंतिम मुदत निश्चित केल्यानंतर त्यांच्या व्यवहारात कोणताही व्यत्यय येणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा