29 C
Mumbai
Sunday, April 21, 2024
घरविशेष‘गगनयान मिशन’साठी भारताकडून अंतराळवीरांची निवड!

‘गगनयान मिशन’साठी भारताकडून अंतराळवीरांची निवड!

चार जणांची नावे समोर

Google News Follow

Related

भारताची अंतराळात मानव पाठवणारी, महत्त्वाकांक्षी अशी ‘गगनयान’ मोहीम लवकरच सुरू होऊ शकते. इस्रोने आतापर्यंत या मोहिमेच्या प्रगतीची सातत्याने माहिती दिली आहे. याच दरम्यान अंतराळात जाण्यासाठी सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या संभाव्य अंतराळवीरांची पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशवासींना ओळख करून देणार आहेत.

अर्थात सरकारने अधिकृतरीत्या या अंतराळवीरांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने चार नावांची निवड केली आहे. त्यांची नावे प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि चौहान अशी आहेत. मात्र त्यांच्या संपूर्ण नावांची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हे ही वाचा:

पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!

हनुमा विहारी आंध्र संघातून बाहेर!

आलोक कुमार विहिंपचे नवे अध्यक्ष; परांडे संघटन सचिव, देशपांडे सहसचिव

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

हे चारही जण एकतर विंग कमांडर आहेत किंवा ग्रुप कॅप्टन. या चारही जणांना अंतराळात जाण्याचे प्रशिक्षण बेंगळुरूमध्ये दिले जात आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रात त्यांची भेट घेऊ शकतील. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात मानव पाठवणारा भारत हा जगभरातील चौथा देश ठरेल.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गगनयान मोहिमेत रस दाखवणाऱ्या ‘टेस्ट पायलट’मध्ये केवळ १२ जणांचा समावेश होता. हे १२ जणच निवडीचा पहिला टप्पा पार पाडू शकले. ही निवड सन २०१९मध्ये बेंगळुरूत भारतीय हवाई दलासाठी काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिनमध्ये (आयएएम)पार पडली होती. निवडप्रक्रियेच्या अनेक फेऱ्यानंतर आयएएमने चार उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सन २०२०मध्ये इस्रोकडून चार जणांना सुरुवातीच्या प्रशिक्षणासाठी रशिया पाठवले गेले होते. हे प्रशिक्षण सन २०२१मध्ये संपले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा