30 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरक्राईमनामासुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

Google News Follow

ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याच्यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. सुशील कुमार याने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यावर ज्युनियर ऍथलिट सागर धनखडचा खून यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमार हा २०२१ पासून तुरुंगात आहे.

सुशील कुमारने रविवार, १३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केले. सुशील कुमार हा जामीनावर बाहेर होता. न्यायालयाने सुशील कुमारला २३ जुलै ते ३० जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. नंतर त्याचा कालावधी आणखी काही दिवस वाढवण्यात आला. या दरम्यान सुशीलच्या गुडघ्याचे ऑपरेशनही झाले होते. तसेच सुशीलला जामीन मंजूर करताना, त्याच्यासोबत दिल्ली पोलिसांचे दोन कर्मचारी असतील, असा आदेश न्यायालयाने दिला होता. यासोबतच सुशील कुमार साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे धमकावणार नसल्याचंही सांगण्यात आलं होतं.

प्रकरण काय?

सुशील कुमारने त्याच्या साथीदारांसह २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनखड, त्याचा मित्र सोनू आणि अन्य तिघांवर ४ मे २०२१ रोजी रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये मालमत्तेच्या कारणावरुन हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर झालेल्या सागर धनखडचा मृत्यू झाला. मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवसापासून सुशील कुमार पसार झाला होता. त्यानंतर १७ दिवसांनी सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती. सध्या या हत्येशी संबंधित सुशील कुमारसह अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून ते तिहार तुरुंगात आहेत. सागर धनखडच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह २० जणांना आरोपी बनवलं आहे. त्यापैकी १८ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

हे ही वाचा:

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा

पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या गटावर दहशतवादी हल्ला

श्रीनगरमध्ये शालेय विद्यार्थी तिरंगामय !

सागर धनखड हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण १ हजार १०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं, ज्यामध्ये सुशील कुमारला मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात १५५ साक्षीदार हजर केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा