29.7 C
Mumbai
Sunday, June 28, 2026
घरक्राईमनामातेलंगणातील महसूल विभाग महिला अधिकाऱ्याकडे सापडली २० कोटींची संपत्ती

तेलंगणातील महसूल विभाग महिला अधिकाऱ्याकडे सापडली २० कोटींची संपत्ती

मे महिन्यात तिला करण्यात आली होती अटक

Google News Follow

Related

तेलंगणा लाचलुचपतविरोधी विभागाने महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या मालमत्तेच्या नव्या तपासात सुमारे २० कोटी रुपयांची मालमत्ता, रोख रक्कम, दागिने आणि इतर संपत्ती उघडकीस आणली आहे. २४ जून (बुधवार) रोजी निलंबित शमीरपेट तहसीलदार व संयुक्त उपनोंदणी अधिकारी थुम्मकोमा सुचारिता यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी हिमायतनगर येथील त्यांच्या निवासस्थानासह त्यांच्या नातेवाईक, बेनामी व्यक्ती आणि सहकाऱ्यांशी संबंधित आणखी तीन ठिकाणी झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांशी विसंगत वाटणारी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळून आली.

हे ही वाचा:

ऍपलचा दणका! मॅकबुक, आयपॅडच्या किंमतीत १ लाख रुपयांपर्यंत वाढ

आम्ही युद्धात नव्हतो! अमेरिका-इराण संघर्षावरून मेलोनींनी नाटोला सुनावले

डेन्मार्कमध्ये पुन्हा अजानवर बंदी, उपनगरे इस्लामाबादसारखी बनलीत !

ओमानजवळ जहाजावर हल्ला; होर्मुझमधील स्थलांतर मोहीम तात्पुरती स्थगित

तपासादरम्यान खालील मालमत्ता सापडली, कीसरा आणि खानामेट येथे दोन भूखंड, शहरातील विविध भागांत तीन फ्लॅटृ, दमाराकुंटा गावात २ एकर १७ गुंठे शेती, दोन चारचाकी वाहने, सुमारे १.२ कोटी रुपयांचे सोने व हिऱ्यांचे दागिने, १२ लाख रुपये रोख, बँक खात्यांमध्ये ३८ लाख रुपये. आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेची नोंदणीकृत किंमत ५.०५ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अधिकाऱ्यांच्या मते, स्थावर मालमत्तेची बाजारातील किंमत नोंदणीकृत किमतीपेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे.

एका लाचलुचपत विरोधी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला आणखी १२ एकर शेतीची कागदपत्रे सापडली असून त्यांची पडताळणी सुरू आहे. या सर्व मालमत्तेची बाजारातील किंमत सुमारे २० कोटी रुपये असू शकते.”

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आणखी मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, सुचरिता यांना २६ मे रोजी लाचलुचपत प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासानुसार, अधिकृत काम करून देण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपयांची लाच मागितली होती आणि त्यापैकी २ लाख रुपये स्वीकारले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा