26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्राईमनामाजुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलचे सत्य आले समोर

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलचे सत्य आले समोर

महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले होते.

Google News Follow

Related

काही दिवसांपूर्वीच सोलापुरात पार पडलेला जुळ्या बहिणींच्या लग्नाची चर्चा राज्यभरात सुरू होती. एका तरुणाने जुळ्या बहिणींशी लग्न केले आणि तो अडचणीत सापडला. महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले होते. मात्र आता या प्रकरणात एक वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी अतुल अवताडे नावाच्या व्यक्तीने लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राहुल फुले नावाच्या व्यक्तीने या नवविवाहित जोडप्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच महिला आयोगानेसुद्धा या जोडप्याची चौकशी सुरु केली आहे. चौकशीत जी माहिती समोर आली आहे त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले आहेत.

दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचे आधीच एक लग्न झालेले आहे. अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतचं त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती.

हे ही वाचा :

गुजरातच्या पराभवानंतर राहुल गांधींनी केले ‘हे’ ट्विट

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट

दरम्यान, रिंकी आणि पिंकी या दोन्ही बहिणी आयटी कंपनीत नोकरीस आहेत. दोघींचे शिक्षणही एकत्र झालेले आहे. जुळ्या असल्यामुळे एकत्रच त्यांचे संगोपन झाले. एकमेकांची त्या दोघींनी इतकी सवय आहे की, त्यांनी एकाच वराशी विवाह करण्याचे ठरविले. मात्र आता पुन्हा नव्याने हे प्रकरण गाजणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा