28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामायवतमाळच्या एटीएममधील पैसे मिळाले बिहारमध्ये...

यवतमाळच्या एटीएममधील पैसे मिळाले बिहारमध्ये…

Related

रायगावमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम कापून आठ लाख ६९ हजार रुपये रोख चोरून नेले होते. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास करून आंतरराज्यीय टोळीला बिहार राज्यात जाऊन कारवाई करत अखेर अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एटीएम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सुधीलकुमार निर्मल पांडे आणि सुकेशकुमार अनिल सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

रायगावमधील बँक ऑफ इंडिया एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरावर काळा रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम कापून आठ लाख ६९ हजार रुपये चोरून नेले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन १०० किलोमीटर परिसरातील दुकाने आणि बाजारपेठांमधील सीसीटीव्हीचे चित्रण तपासण्यात आले होते, अशी माहिती यावतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.

हे ही वाचा:

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही

…म्हणे मावळमधील गोळीबार भाजपाने भडकाविल्यामुळे!

राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास सापडला मुहूर्त

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

सीसीटीव्हीमध्ये एक आर्टिगा गाडी संशयास्पदरित्या यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी फिरताना आढळून आली. त्यानंतर सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत आरोपी बिहारमध्ये असल्याचे शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी बिहार गाठून आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी इंटरनल एटीएम स्कॅनर, हॅन्ड एटीएम स्कॅनर, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्कीमर, १५ एटीएम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा