28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामाआर्यन खानचे काय होणार? गुरुवारी जामिनासंदर्भात सुनावणी

आर्यन खानचे काय होणार? गुरुवारी जामिनासंदर्भात सुनावणी

Related

कॉर्डिलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घातलेल्या छाप्यात पकडण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनासंदर्भात गुरुवारी सुनावणी होणार आहे. बुधवारी सत्र न्यायालयात यावर आर्यन खानच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. अमित देसाई हे आर्यनची बाजू मांडत होते. आवश्यकता भासल्यास सतीश मानेशिंदेही आर्यनची बाजू मांडू शकतात.

न्यायालयासमोर अमित देसाई म्हणाले की, प्रतीक गाबा याच्या निमंत्रणावरून आर्यन खान त्यादिवशी क्रूझवर गेला होता मात्र तो क्रूझवर पोहोचण्याआधीच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट यांना अडवण्यात आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तपासण्यास त्यांनी परवानगी दिली तसेच त्यांच्याकडे अमली पदार्थ आहेत, हे त्यांनी मान्य केले.

अमित देसाई पुढे म्हणाले की, विक्रांत चोकर आणि इष्मीत सिंग यांनाही क्रूझवर जाताना एनसीबी अधिकाऱ्यांनी अडवल आणि विचारलं की त्यांच्याकडे अमली पदार्थ आहेत का, त्यावर त्यांनी हो म्हणत स्वतःकडील अमली पदार्थ काढून एनसीबी अधिकाऱ्यांना दाखवले असे एनसीबीचा पंचनामा म्हणतोय. पण वास्तव हे आहे की, आर्यन खान याच्याकडे काहीही सापडलेले नाही. पण एनसीबीच्या पंचनाम्यात अस म्हटलंय की, अरबाझकडे सापडलेले चरस आर्यन खान क्रूझ पार्टीत वापरणार होता, हे त्याने मान्य केले आहे. विक्रांत, इष्मीत आणि अरबाझ यांच्याकडून अमली पदार्थ सापडले पण आर्यनकडून नाही. देसाई म्हणाले की, आतापर्यंत एनसीबीचा जो तपास झाला आहे, त्यात अमली पदार्थ आर्यन खानकडून मिळालेले नाहीत आणि त्याने अमली पदार्थाचे सेवनही केलेले नाही. त्यामुळे अमली पदार्थांचे सेवन करणे आणि त्याची विक्री करणे हे आरोप आर्यनसाठी लागू होत नाहीत.

दोघांशी निगडित जो पंचनामा झाला त्यात मुनमुनचा संबंध नव्हता. अमित देसाई म्हणाले, एनसीबीच्या पंचनाम्यानुसार आर्यनकडे ना अमली पदार्थ सापडले ना पैसे. जर त्याच्याकडे पैसेच नाहीत तर तो ड्रग्स विकत घेऊन सेवन कसे करू शकतो किंवा ते विकत तरी कसे घेऊ शकतो. एनसीबीने दुसऱ्यांदा ज्यावेळी आर्यनचा रिमांड मागितला, त्यावेळी आधीच्याच रिमांडमधल्या मुद्द्यांचा आधारे मागण्यात आला. एनसीबी ड्रग्स प्रकरणात अनेकांना अटक करतेय ही चांगली गोष्ट आहे पण ज्यांच्याकडे काहीही सापडलं त्यांना अस अडकवून ठेवणे चुकीचं आहे. यांचा दुसऱ्यांदा रिमांड मिळेपर्यंत दुसऱ्या आरोपींना अटक करून कोर्टात हजरही केलं नाही.

अमित देसाई यांनी युक्तिवाद केला की, ७ तारखेला एनसीबीने आर्यनच्या व्हाट्सऍप चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा न्यायालयात केला. शिवाय आर्यन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आचित कुमारला अटक केल्याचं सांगितलं मात्र आचितची अटक आणि क्रूझ पार्टीच कोणतंही कनेक्शन अद्याप समोर येऊ शकले नाही.

 

हे ही वाचा:

राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सोडून पवार पोहोचले थेट ‘पॅरिस’मध्ये

बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीने बदलले रूप

 

अमित देसाई यांनी जामीन मागण्यासाठी बाजू मांडली की, आर्यन खान याचा जबाब ३ ऑक्टोबरला नोंदवण्यात आला त्यानंतर नाही. आचित कुमार याच्याकडे फक्त २.६ ग्रॅम चरस सापडलं. या सगळ्या बाबींचा विचार करून जामीन मिळणं गरजेचं आहे.

अमित देसाई यांनी न्यायालयाला विनंती केली की, एनसीबीची कस्टडीची मागणी ७ तारखेला किल्ला कोर्टाने फेटाळून लावली आणि आर्यन खानसहित इतरांना न्यायालयीन कोठडी सुनावली. ही लहान मुलं आहेत. इतर देशात ड्रग्सला काही प्रमाणात परवानगी आहे. हे काही पेडलर्स नाहीत, रॅकेट चालवणारे नाहीत. याची शिक्षा त्यांना मिळालीय. जे भोगायचे ते त्यांनी भोगलेले आहे. त्याचा त्यांना पश्चाताप झाला आहे. आधीच्या कायद्यानुसार अमली पदार्थ सेवन केल्यास ५ वर्षांची शिक्षा होती, ती कमी करून २००१ ला एका वर्षावर आणली गेली. त्यामुळे जामीन देण्यात यावा. तो न दिल्यास त्याच्यावर अन्याय होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा