28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणपत्रकार परिषदेत महाराष्ट्र सोडून पवार पोहोचले थेट 'पॅरिस'मध्ये

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सोडून पवार पोहोचले थेट ‘पॅरिस’मध्ये

Google News Follow

Related

महाराष्ट्राची गेल्या काही काळातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, बलात्कारांची वाढती संख्या, पूरग्रस्तांचे अश्रू या सगळ्या अरिष्टातून जनतेला जणू दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेची सुरुवात ‘लव्ह इन पॅरिस’ने केली आणि सर्वांनाच धक्का बसला. हा नेमका वयाचा परिणाम आहे की आयकर खात्याच्या छाप्यांचा, असा उद्विग्न सवाल भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत घडलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पण त्याबद्दल एकही शब्द न काढता शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाच्या ‘लव्ह इन पॅरिस’चा गौप्यस्फोट केला.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चिरंजीवाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरमध्ये जाऊन एका मुलीला लग्नाची मागणी घातल्याचा उल्लेख पवारांनी केला. दोन्ही कुटुंबियांकडून या लग्नाला परवानगीही आयफेल टॉवरवरूनच घेतल्याचेही शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीने बदलले रूप

…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

राष्ट्रवादीचे आमदार नवघरे शिवाजी महाराजांच्या घोड्यावरच उभे राहिले!

‘मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री, पण पवारसाहेब एकदाही सलग पाच वर्षे नव्हते’

 

पवारांनी असेही सांगितले की, आता आमचा दृष्टिकोन व्यापक झाला आहे. आम्ही आता इस्लामपूरपर्यंत सीमित नाही तर थेट पॅरिसला गेलोय.

पवारांच्या या वक्तव्याबद्दल भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक ट्विट केले आहे. ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्षाच्या मुलाने आयफेल टॉवरवर एका मुलीला प्रपोज केलं, अशा वाक्याने शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात केली. राज्यात इतक्या महिलांवर बलात्कार झाले यावर एक शब्द नाही. कशाचा परिणाम वयाचा की आयकर खात्याच्या धाडींचा???

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा