31 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर क्राईमनामा कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी

कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी

Related

देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशात दररोज लक्षावधींच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. असे असताना देखील उत्तर प्रदेश मधील बुदौन येथे एका काझीच्या अंत्यविधींसाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. त्यामुळे तिथे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करावे लागले होते.

रविवारी ही घटना घडली होती. काही तासांसाठी मोठा जनसमुदाय एका छोट्या जागी जमला होता. त्यामुळे त्याठिकाणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे लोक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोहोचले होते.

हे ही वाचा:

क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली

७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा

आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल

गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये बळी पडलेल्यांचे मृतदेह अजूनही शवागारात

बुदौनचे एसएसपी संकल्प शर्मा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काझीच्या अंत्यविधींसाठी सुमारे ५,००० लोकांचा समुदाय जमला होता. त्यानंतर आम्ही लाऊडस्पीकरून वारंवार लोकांना गर्दी टाळून घरी जाण्याची विनंती केली. त्यानंतर थोड्यावेळाने सगळा जनसमुदाय पांगला. गर्दी कमी झाल्यानंतर तो भाग व्यवस्थितपणे सॅनिटाईझ करण्यात आला होता.

हजरत अब्दुल हमीद सलीम अल काझी असे या जिल्हा काझींचे नाव आहे. हे काझी जिल्ह्यात लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १९३९ मध्ये मौलवी अब्दुल कादीर यांच्या घराण्यात झाला होता. ते या भागामध्ये एक सुफी संत म्हणून प्रसिद्ध होते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा