25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरक्राईमनामा५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी

५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी

मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सऍप मेसेजद्वारे धमकीचा संदेश आला

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे दुसरीकडे बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अशातच आता पुन हा एकदा सलमान खान याच्या नावे धमकी आल्याचे समोर आले आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सऍप मेसेजद्वारे धमकीचा संदेश देण्यात आला आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.

सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे वैर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे होते.

दरम्यान, आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सऍप मेसेजद्वारे धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्याने ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट होईल, असा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांकडून सध्या हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

राजकोट पुतळा प्रकरण: पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक

हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा

याआधी बुधवारी मुंबई पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका आरोपीला हरियाणातील पानिपत येथून अटक करण्यात आली. सुख्खा असे या व्यक्तीचे नाव आहे. तो बिष्णोई टोळीचा शार्प शूटर असून त्याला नवी मुंबईत आणण्यात आले आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. २०२२ मध्ये, लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांच्या सांगण्यावरून सुख्खाने सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्महाऊसची रेकी केली होती. रेकीनंतर त्याला सलमानवर हल्ला करायचा होता, पण त्याचा प्लॅन फसला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा