31 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरक्राईमनामाआरे कॉलनीत बाईक विजेच्या खांबाला धडकली; तिघे मृत्युमुखी

आरे कॉलनीत बाईक विजेच्या खांबाला धडकली; तिघे मृत्युमुखी

एकाच मोटारसायकलवरून तीन जण बसून जात होते

Google News Follow

Related

गोरेगाव पूर्व आरे कॉलनी परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे तिघे एकाच मोटारसायकलवरून जात असताना एका वळणावर अचानक विजेच्या खांबाला धडकली. पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे पोहोचल्यावर दोघांना मृत घोषित करण्यात आले, तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. राधेश्याम दवंडे (३४), विवेक राजभर (२४), रितेश साळवे हे तिघेही एकाच मोटारसायकलवरून पवईहून गोरेगावच्या दिशेने जात होते. बिट चौकीजवळ, पिकनिक पॉइंटजवळ त्यांची मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकली. तिघेही दुचाकीवरून फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

हे ही वाचा:

टायगर मेमनच्या तीन सदनिका केंद्र सरकारच्या ताब्यात

पतंजलीच्या ‘दिव्य मंजन’मध्ये माशांचा अर्क असल्याचा दावा

अयय्या सुखू-सुखू…

राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार सामना !

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. दवंडे आणि राजभर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर साळवे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र या उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून हा अपघात नक्की कसा झाला याचा तपास करण्यात येत आहे. तिघेही दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पीडितांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, पोलिसांनी सांगितले की, निकाल आल्यानंतरच त्यांनी दारू प्यायली होती की नाही याची पुष्टी केली जाईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा